Rain File photo
पुणे

पुण्यात संततधार; मॉन्सून रविवारी राज्यात दाखल होण्याची शक्यता

मॉन्सून राज्यात दाखल होत असल्याने रविवारपर्यंत दुपारनंतर राज्यात बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याकाळात आकाश ढगाळ राहील.

सकाळ वृत्तसेवा

मॉन्सून राज्यात दाखल होत असल्याने रविवारपर्यंत दुपारनंतर राज्यात बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याकाळात आकाश ढगाळ राहील.

पुणे : मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरींनी शुक्रवारी (ता.४) राज्यभरात विविध ठिकाणी जोरदार बॅटिंग केली. कोकण, गोवा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मॉन्सूनपूर्व सरी कोसळल्या. पुढील आठवडाभर तरी राज्यभरात पाऊस पडेल. तर रविवारी (ता.६) तळ कोकणात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (meteorological department has forecast the monsoon in Lower Konkan on Sunday)

गुरुवारी (ता.३) केरळात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी उत्तर कर्नाटकपर्यंत जोरदार आगेकूच केली. त्याचबरोबर दक्षिण केरळ ते दक्षिण महाराष्ट्रापर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात पावसाने हजेरी लावली. विशेषतः घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊस पडल्याचे, हवामान खात्याने म्हटले आहे. मॉन्सून राज्यात दाखल होत असल्याने रविवारपर्यंत दुपारनंतर राज्यात बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याकाळात आकाश ढगाळ राहील.

पुण्यात दुपारनंतर संततधार

सकाळपासून उकाड्याने हैरान असलेल्या पुणेकरांना दुपारनंतर दिलासा मिळाला. शहरात बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे दुपारनंतर संततधार पद्धतीने पाऊस पडला. विशेषकरून घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. सोमवार (ता.६) पर्यंत तरी आकाश मुख्यतः ढगाळ असेल आणि दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुण्यातील पाऊस

पुणे : ४ मिलिमिटर

लोहगाव : ८.३ मिलिमिटर

पुण्यात झालेल्या पावसाने परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.तर काही घरात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले.आंबेगाव बुद्रुक मधील कात्रज नवलेपूल बाह्यवळण रस्त्याचे मागील काही महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम सुरु आहे. महामार्गासह, दत्तनगर ते आंबेगाव सेवा रस्त्याचे काम अर्धवट आहे. सेवा रस्त्यालगत असणाऱ्या मोखा इंजिनियरिंग जवळील राहणाऱ्या सुरेश वासवंड यांचेसह इतरांच्या घरात रस्त्यावरचे पाणी शिरले आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पाणी घरात घुसल्याने स्थानिकांनी महामार्ग प्रशानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आंबेगाव शिवसृष्टी भुयारी मार्ग काही वेळासाठी बंद

आंबेगाव बुद्रुक कडून शिवसृष्टीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे, बरीच वाहतूककोंडी झाली होती.भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी याठिकाणी वाहतूककोंडी कमी करत होते. दरम्यान साचलेल्या पाण्याला महामार्ग प्रशासनाच्या जेसीबीच्या सहाय्याने वाट करून देण्यात आली. साधारण अर्ध्यातासात वाहतूक सुरळीत झाली.

कात्रज नवलेपूल बाहयवळण रस्त्यावर वाहतूककोंडी

आंबेगाव डी मार्ट समोर बाहयवळण रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने, राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोर सांडपाणी वाहिनीसाठी खड्डा खोदण्यात आलेला आहे.आणि खोदलेल्या खड्ड्याच्या भोवती राडारोडा पडला असल्याने,आणि मुसळधार पाऊस झाल्याने या वाहिनीतून पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला होता.दरम्यान,रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर, महामार्ग प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने पाण्याला वाट काढून दिली. परंतु, यात वाहनांची मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळाली.

दत्तनगर भारती विद्यापीठ राजमाता भुयारी मार्गात पाणी

दत्तनगर भारती विद्यापीठला जोडणाऱ्या राजमाता भुयारी मार्गात आज झालेल्या पावसाने खचाखच पाणी भरले होते. त्यामुळे, तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पाऊस आणि पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. असे असतानाही दत्तनगर चौकात आज वाहतूक कोंडी झालेली नव्हती.

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT