share auto rickshaw sakal
पुणे

Rickshaw Rent : मेट्रोसाठी शेअर रिक्षाचे पुणे, पिंपरी चिंचवडमधील प्रवासी भाडे जाहीर

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रोच्या १८ स्थानकांपासून परिसरातील शेअर रिक्षाचे प्रवासी भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बुधवारी जाहीर केले.

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रोच्या १८ स्थानकांपासून परिसरातील शेअर रिक्षाचे प्रवासी भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बुधवारी जाहीर केले. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा संघटनांना केले आहे. घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना शेअर रिक्षा उपयुक्त ठरणार आहे.

शेअर रिक्षाचे भाडे ठरविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील रिक्षा पंचायत, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशन, बघतोय रिक्षावाला, शिवनेरी, आप रिक्षा संघटना, सावकाश संघटना, आझाद हिंद संघटना आदी विविध संघटनांची तीन वेळा बैठक घेतली होती. तसेच दोन्ही शहरांत सर्वेक्षण केले. त्यानंतर रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर शेअर रिक्षाचे भाडे निश्चित केले, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

दोन्ही शहरांत मेट्रोची १८ स्थानके आहेत. त्यातील बहुतेक स्थानकांच्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात शेअर रिक्षा धावणार आहे. पिंपरी चिंचवड मेट्रो स्थानकापासून १० किलोमीटरच्या परिसरात शेअर रिक्षाची वाहतूक होईल. ‘प्रवासी आणि चालक, या दोन्ही घटकांना शेअर रिक्षा फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी पोलिसांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे,’ असे रिक्षा पंचायतीचे समन्वयक नितीन पवार यांनी सांगितले.

असे असेल शेअर रिक्षाचे भाडे

मेट्रो स्थानक - परिसर (किलोमीटर)-----प्रती प्रवासी भाडे रुपयांत (किमान ते कमाल)

१ - वनाज --- ४. ७ --------- ११ ते २७

२ - आनंदनगर ---४. ४----------११ ते ४३

३ - आयडीयल कॉलनी --४. ६ ---१२ ते ३७

४ - नळस्टॉप ---२. ४ -------११ ते २२

५ - गरवारे कॉलेज -- १. ३----१२ ते १५

६ - महापालिका भवन --- १. ७----१२ ते २७

७ - शिवाजीनगर न्यायालय--- १. ४ ------ ११

८ - मंगळवार पेठ (आरटीओ)-- ४. ६ ----११ ते ३७

९ - पुणे रेल्वे स्टेशन -----२. ५ -----------११ ते २१

१० - रुबी हॉल ---------३. ५ -----------११ ते ३०

११- शिवाजीनगर एसटी स्थानक--- ३. ४----११ ते ३०

१२ - बोपोडी --------------६. ४ -----१४ ते ४९

१३ - दापोडी ------------४. ५ --------१५ ते ३५

१४ -फुगेवाडी ------------३. ९ --------२५ ते ३०

१५ - कासारवाडी --------३. ४ ---------१७ ते २५

१६ - भोसरी, नाशिक फाटा---४. ६ ----------१३ ते ३६

१७ - संत तुकारामनगर -------३. ७ -------१२ ते ३४

१८ - पिंपरी चिंचवड ---९. ८ --------१३ ते ७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT