Metro 
पुणे

लोहमार्ग टाकण्याचे काम मार्चपासून

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - दापोडी व महापालिका भवन येथील मेट्रो स्थानकाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. मेट्रोच्या लोहमार्गाचे काम मार्चमध्ये सुरू होईल.
संत तुकारामनगर येथील स्थानकाच्या सर्व दहाही खांबांचे पिलर आर्म्स बसवून झाले आहेत. तेथील वरच्या बाजूच्या खांबांचे व कॅप बसविण्याचे काम सुरू झाले आहे. खांबांवर कॅप बसविल्यानंतर तेथील व्हायाडक्‍टचे काम सुरू होईल. फुगेवाडी येथील पाच खांबांचे पिलर आर्म्स बसविण्यात आले आहेत.

दापोडीपासून सुरू झालेल्या व्हायाडक्‍टचे काम येत्या पंधरवड्यात फुगेवाडी स्थानकापर्यंत पोचेल. तेथील स्थानकाचे काम झाल्यानंतर व्हायाडक्‍टचे काम पुढे मार्गस्थ होईल.

दापोडी येथील स्थानकाचे खांब झाले आहेत. महापालिका भवनाजवळील स्थानकाचे सात खांब पूर्ण झाले आहेत. अहल्यादेवी होळकर चौकातील एका खांबाच्या फाउंडेशनचे काम सुरू आहे. तो खांब झाल्यानंतर त्या चौकात आणखी एक खांब उभारण्यात येणार आहे. या दोन्ही स्थानकांसाठी पिलर आर्म्स उभारण्याचे काम सुरू होणार आहे.

मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे म्हणाले, ‘‘खांबांसाठी २५७ ठिकाणी पाया घेण्यात आले असून, त्यापैकी १९७ खांब तयार झाले आहेत. १२४ खांबांवर कॅप बसविल्या आहेत. व्हायाडक्‍टचे ७७ स्पॅन झाले आहेत. हे अंतर सुमारे अडीच किलोमीटर आहे. त्यावर लोहमार्ग टाकण्याच्या निविदा फेब्रुवारीत मंजूर होतील. त्यामुळे मार्चमध्ये लोहमार्ग टाकण्याचे काम सुरू होईल. खराळवाडीपासून महापालिका भवनाच्या बाजूला व्हायाडक्‍टचे काम येत्या पंधरवड्यात सुरू होईल.’’

सव्वीस स्पॅन हे लोखंडी गर्डरचे
व्हायाडक्‍टचे २६ स्पॅन हे लोखंडी गर्डरचे असतील. हॅरिस पूल, नाशिक फाटा, बीआरटी बसथांबे या ठिकाणी कॉम्पोझिट गर्डर बसविण्यात येणार आहेत. हे गर्डर कंपनीच्या कार्यशाळांत तयार करून नंतर जागेवर आणून बसविण्यात येतील, असे मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT