एमआयडीसी, भोसरी - येथील एफ-२ ब्लॉकमधील आयुर्वेदिक दवाखान्याजवळील रस्त्यावरून वाहत असलेले दुर्गंधीयुक्त पाणी. 
पुणे

एमआयडीसीत ड्रेनेजलाइनचा अभाव

सकाळवृत्तसेवा

भोसरी - भोसरी एमआयडीसी परिसरात ड्रेनेजलाइन नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. येथून कररूपाने सर्वाधिक महसूल मिळत असूनही महापालिका ड्रेनेजलाइनची सुविधा देत नसल्याने लघुउद्योजकांमधून संताप व्यक्त होत आहे.  

एमआयडीसीतील इंद्रायणी चौक, संकेत हॉटेल ते यशवंतराव चव्हाण चौक, संपूर्ण एफ-२ ब्लॉक त्याचप्रमाणे एमआयडीसीतील विविध रस्त्यांवर सांडपाणी वाहताना दिसते. तेथून वाहन गेल्यानंतर ते दुर्गंधीयुक्त पाणी अन्य वाहनचालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. त्यातून बऱ्याच वेळा वादावादीचे प्रसंगही घडतात; तसेच या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे कामगारांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

एमआयडीसीमध्ये मैलाशुद्धीकरण प्रकल्पच नसल्याने ड्रेनेजलाइन टाकण्यात आलेली नाही. काही लघुउद्योजकांनी कंपनीतील रसायनमिश्रित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोष खड्डे अथवा तत्सम यंत्रणा उभी केली आहे. काही कंपन्यांनी हे पाणी गटारात अथवा उघड्यावर सोडून दिल्याचे पाहावयास मिळते. महापालिका आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी लघुउद्योजकांची आहे.

‘या परिसराच्या नियोजनाचे अधिकार एमआयडीसीकडे असल्याने त्यांनीच या ठिकाणी ड्रेनेजलाइनचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे,’’ असे महापालिकेच्या जलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय भोसले यांनी सांगितले. यासंदर्भात भोसरी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि भोसरी एमआयडीसी यांनी संयुक्त बैठक घेऊन एमआयडीसी परिसरात मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि ड्रेनेजलाइनच्या समस्येवर तोडगा काढला पाहिजे. त्याचप्रमाणे राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्‍न सोडवून लघुउद्योजकांना दिलासा दिला पाहिजे.
- संजय वाबळे, लघुउद्योजक व स्वीकृत सदस्य, महापालिका

भोसरी एमआयडीसीतील हा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या परिसराची पाहणी अनेक वेळा अधिकाऱ्यांकडून केली जाते. मात्र, समस्येवर तोडगा काढला जात नाही. महापालिकेला एमआयडीसीतून कररूपाने सर्वाधिक महसूल मिळत असतानाही ही परिस्थिती आहे.
 - विकास भुंबे, संस्थापक अध्यक्ष, आधार सोशल फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT