pune sakal
पुणे

किल्ले पुरंदर आणि परीसर विकासार्थ पर्यटनमंत्र्यांना साकडे

आमदार संजय जगताप यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

श्रीकृष्ण नेवसे

सासवड : छत्रपती संभाजी महाराज व सवाई माधवराव पेशवे यांचे जन्मस्थळ असलेल्या आणि आठ शतकांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले पुरंदर आणि परीसरातील इतर एेतिहासिक, धार्मिक स्थळांच्या विकासार्थ पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आदित्य ठाकरे यांना पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी समक्ष भेटीत साकडे घातले आहे. विशेष म्हणजे पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना श्री. ठाकरे यांनी कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव लगेच सादर करण्याचे स्पष्ट केले. याबाबत आमदार जगताप यांनाही झालेली कार्यवाही कळविली आहे. (Pune News)

पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी आज सकाळ शी बोलताना सांगितले. राज्यातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी शासनाने मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 24 सदस्यांची सुकाणू समिती स्थापन केली. त्याबाबत आढावा बैठकही झाली. त्यात किल्ले विकास व किल्ले पायथा आणि भोवतीच्या 50 कि.मी. परीसरारत एेतिहासिक वातावरण निर्माण करणे, किल्ल्याचा इतिहास समजेल असे फलक, माहिती, चित्रे आणि स्थानिक संस्कृतीचे दर्शनही घडविले जाणार आहे. साहसी खेळ, गिर्यारोहण, एेतिहासिक संदर्भ जतन, पराक्रमाच्या घटना, लगतचे वन्यजीव, वनसंपदा, जैवविविधता याविषयची माहिती दिली जाणार आहे. तिथल्या लोकपरंपरा, ध्वनिप्रकाश कार्यक्रम आदी आऱाखडा समितीसमोर ठेवला जाणार आहे.

गडकिल्ल्यांच्या परिसरात हेलीकाॅप्टरच्या साह्याने बिया टाकून नैसर्गिक वनराई विकसीत केली जाणार आहे. यात पायाभूत सुविधांचा विकास करीत अनुषंगीक पर्यटन केंद्रेही उभारली जाणार आहेत., हे जाणून घेऊन आमदार संजय जगताप यांनी या सुकाणू समितीमार्फत पहील्या टप्प्यात किल्ल्यांच्या संवर्धनात किल्ले पुरंदर व परीसर घेण्याची आग्रही मागणी पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे समक्ष भेटीत मांडली. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांकडे श्री. ठाकरे यांनी हा प्रस्ताव लगेच तपासून सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसे आमदार जगताप यांना लेखी कळविले आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदर व परीसर विकासार्थ आणि इथले एेतिहासिक महत्व जतन होण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आमदार श्री. जगताप यांनी सांगितले.

पहील्या टप्प्यात पुरंदर का?

किल्ले पुरंदरला छत्रपती संभाजीराजेंचे जन्मस्थळ म्हणून महत्व आहेच. शिवाय किल्ले परीसरात सासवड (ता. पुरंदर) शहरासारख्या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे बंधू संत सोपानदेवांची समाधी आहे. सासवडला अंबाजी पुरंदरे, बाळोबा कुंजीर व इतर सरदारांचे वाडे लक्ष वेधून घेतात. लगत सोनोरीला सरदार पानसे यांचा किल्ले मल्हारगड आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराया जेजुरीगडावर आहे. यादवकालीन वास्तुशिल्पकलेचा नमुना श्री. भुलेश्वर मंदिर, शंभू महादेवांची सिद्देश्वर, चांगा वटेश्वर, पांडेश्वर, जवळार्जूनची पांडवकालीन मंदिरे याच क्षेत्रात वैभवशाली साक्षीदार आहेत. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर व कोडीतला आहे. श्री. कानिफनाथ गड, श्रीक्षेत्र दत्तांचे नारायणपूर, नव्याने प्रती बालाजी केतकावळ्यात स्थापले आहेत.

जेजुरीचा अहिल्याबाई होळकर तलाव, पेशवे तलाव, दिवेघाटातील मस्तानी तलाव सौंदर्य वाढवितात. त्यामुळे देश - विदेशातून भाविक, पर्यटक येतात. जर अजून विकासात्मक कामे झाली, सोयीसुविधा वाढल्या तर तर येथील पर्यटन चार पटीने वाढेल. त्यामुळे पहील्या टप्प्यात किल्ल्यांच्या संवर्धनात व परीसर विकासार्थ किल्ले पुरंदर व परीसर घेण्याची आग्रही मागणी केल्याचे आमदार संजय जगताप यानिमित्ताने दैनिक सकाळ शी बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT