Pune Porsche Crash  esakal
पुणे

2024 Pune car crash: पोर्शे कार अपघातानंतर केलेले कारनामे भोवणार; गुन्ह्यांत कलमवाढ! अल्पवयीन आरोपीचा पाय खोलात

सकाळ वृत्तसेवा

पुणेः पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलावर येरवडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली आहे. रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी पुराव्यात छेडछाड, कट रचणे, खोटे दस्ताऐवज तयार करणे आणि नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना लाच दिल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमासह विविध कायद्यांनुसार मुलावर कारवाई होणार आहे.

अपघात झाल्यापासून त्याच्या तपासातील अनेक टप्प्यांची माहिती देणारा पुरवणी अहवाल गुरुवारी (ता. २६) पोलिसांनी बाल न्याय मंडळास (जेजेबी) सादर केला. त्यात पोलिसांनी वाढविलेली कलमे नमूद करण्यात आले आहेत. पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत एका अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. कल्याणीनगर येथे १९ मेला मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला होता. दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेत जेजेबीमध्ये हजर केले होते. त्यानंतर काही दिवसांना मुलाला जामीन मंजूर करण्यात आला होता.

मुलाने त्याचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि आई शिवानी विशाल अग्रवाल यांच्यासह ससून रुग्णालयातील वॉर्ड नंबर ४० मध्ये आरोपी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना आरोपी अमर गायकवाड व अश्पाक मकानदार यांच्यामार्फत लाचेची प्रलोभने दिली. त्यानंतर ससूनचे अधिष्ठाता अजय तावरे याच्या सांगण्यावरून सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण पुरावा असलेले स्वतःचे रक्त बदलून त्याचे शिवानी अग्रवाल यांच्या रक्ताचा नमुना दिला.

हाळनोर यास रुग्णालयातील रजिस्टर तसेच तपासणी फॉर्मचे बनावटीकरण करण्यास भाग पाडण्याच्या गुन्ह्यात मुलाचा सहभाग होता. स्वतःचा रक्त नमुना नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलाने इतर आरोपीच्या संगनमताने फौजदारी पात्र कट रचून तो पूर्णत्वास नेला. आरोपी अतुल घटकांबळे यांच्यामार्फत तीन लाख रुपयांची लाच डॉ. हाळनोर याने स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मुलाविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार पुरवणी अहवाल जेजेबीमध्ये सादर करण्यात आला आहे. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससूनमधील डॉक्टरांसह इतरांवर दाखल असलेले सर्व कलमे मुलावर देखील दाखल करण्यात आले आहेत.

मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर ४ ऑक्टोबरला सुनावणी

अल्पवयीन मुलाला प्रौढ ठरविण्याबाबत पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेबीबी) अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर अद्याप निकाल झालेला नाही. त्या अर्जावर पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.

अपघात प्रकरणी मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात विविध कलमांनुसार कलमवाढ करण्यात आली आहे. तपासात मुलाचा इतर गुन्ह्यांत देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ही कलमवाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता चौकशी केली जाणार आहे. तर मुलाला प्रौढ समजून त्यावर फौजदारी खटला चालविण्यासाठीच्या अर्जावर पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.

गणेश इंगळे, तपास अधिकारी व सहायक पोलिस आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates: राज्याला पाऊस झोडपणार! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

Mumbai Rain Video: पावसाच्या सरी अन् विजांचा कडकडाट! मुंबई, नवी मुंबईत मुसळधार; व्हिडिओ व्हायरल

Police Transfers : राज्यातील 'या' आयपीएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या!

Amazon Great Indian Festival 2024 : आजच्या विशेष ऑफर्स आणि सर्वोत्तम डील्स; वाचा एक क्लिकवर

Pune Murder: पुण्यात पुन्हा खून; प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या!

SCROLL FOR NEXT