Kiren Rijiju  sakal
पुणे

Kiren Rijiju : जे संविधान हातात पकडून फिरत आहेत त्यांनीच संविधान, लोकशाहीची हत्या केली

किरेन रिजिजू हे पुणे दौऱ्यावर असून, ते पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जे संविधान हातात पकडून फिरत आहेत त्यांनीच संविधान, लोकशाहीची हत्या केली होती. बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत येण्यापासून रोखले, मंत्रिमंडळातही घेतले नव्हते, पंडित नेहरूंनी त्यांचा वारंवार अपमान केला. हेच लोक आता भाजपकडून संविधान धोक्यात आहे, मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर करत आहेत. पण दरवेळी हा समाज काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी केली.

किरेन रिजिजू हे पुणे दौऱ्यावर असून, ते पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यावेळी उपस्थित होते.

किरेन रिजिजू म्हणाले, महाराष्ट्र वीरांची भूमी आहे, पण गेल्या काही काळापासून येथील राजकीय वातावरण राज्याला बदनाम करत आहे. अल्पसंख्याक समुदायाची दिशाभूल केली जात असल्याने ती रोखण्यासाठी मी महाराष्ट्रात सर्वत्र फिरत आहे. अल्पसंख्याक समुदायात सहा धर्म आहेत.

पण काँग्रेसच्या काळात हे अल्पसंख्याक मंत्रालय केवळ मुस्लिमांचेच आहे असे चित्र निर्माण केले होते. पण गेल्या १० वर्षात मोदी सरकारने सर्वांना समान संधी देऊन त्यांचा विकास केला आहे. वोट बँक राजकीय वापर मुस्लिमांचा केला पण आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात आहे.

परदेशात जाऊन राहुल देश विरोधी शक्तींच्या मदतीने कार्यक्रम घेतात आणि भारतात अल्पसंख्याक, दलित सुरक्षीत नाहीत. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे असे खोटे सांगून देशाची बदनामी केली. महाराष्ट्रातही संविधान धोक्यात आहे असा खोटा प्रचार केला जात आहे. हा अल्पसंख्याक समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन बांधले जाणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणार आहे. त्यामध्ये वसतीगृह, ग्रंथालय,कौशल्य विकास केंद्र, क्रीडांगण आदीचा समावेश असणार आहे. काँग्रेसच्या प्रचाराला बळी पडून हा समाज काही काळ भरकटला होता. पण आता ते पुन्हा भाजपसोबत येतील असा विश्‍वास रिजिजू यांनी व्यक्त केला.मत दिले तर सत्तेत वाटा ही मिळेल

मुस्लीम समुदायाला आम्ही वेगळी वागणूक दिली नाही. पण त्यांनी मत दिले तर आमची सत्ता येईल, त्यानंतरच त्यांना सत्तेत वाटा मिळेल. मत दिले नाही तर संधी कशी मिळणार? असा प्रश्‍न रिजिजू यांनी उपस्थित केला. तसेच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकामुळे मुस्लिमांची जमीन काढून घेतली जाणार, मशीद पाडली जाणार असे लावून स्पीकर घेऊन खोटे पसरविले जात आहे, असा कोणताही प्रकार होणार नसल्याचे रिजिजू यांनी सांगितले.

मत दिले तर सत्तेत वाटा ही मिळेल

मुस्लीम समुदायाला आम्ही वेगळी वागणूक दिली नाही. पण त्यांनी मत दिले तर आमची सत्ता येईल, त्यानंतरच त्यांना सत्तेत वाटा मिळेल. मत दिले नाही तर संधी कशी मिळणार? असा प्रश्‍न रिजिजू यांनी उपस्थित केला. तसेच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकामुळे मुस्लिमांची जमीन काढून घेतली जाणार, मशीद पाडली जाणार असे लावून स्पीकर घेऊन खोटे पसरविले जात आहे, असा कोणताही प्रकार होणार नसल्याचे रिजिजू यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT