Ajit Pawar  Sakal
पुणे

Ajit Pawar : राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्याचा गैरसमज, पक्षाला अपेक्षित तेवढ्या जागा मिळणारच - अजित पवार

रायगडसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे जाहीर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पहिल्या उमेदवाराच्या नावाची पवार यांच्याकडून घोषणा

सकाळ वृत्तसेवा

Pune News : "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ तीन जागा मिळत असल्याचा गैरसमज पसरविला जात असून प्रत्यक्षात भाजप, शिवसेना व आमच्यात कुठलेली गैरसमज नाहीत. राष्ट्रवादी पक्षाला अपेक्षित होत्या, तेवढ्या जागा मिळणार आहेत.

जागा वाटपाबाबतचे 99 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित उमेदवारांच्या नावांची घोषणा २८ मार्चला मुंबईत होईल'' असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे जाहीर केले. पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा करत पक्षाच्या पहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे मंगळवारी पुण्यात पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार यांची बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित होत्या. या बैठकीसाठी पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ""मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप या मित्रपक्षांनी मिळून ४१ जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे त्यांना व्यवस्थित जागा मिळाव्यात अशी त्यांची मागणी होती. आम्ही एकत्रित बसून मार्ग काढला आहे.

कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा प्रकारे राष्ट्रवादी पक्षाला अपेक्षित जागा मिळतील. त्यानुसार, २८मार्चला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उर्वरित जागांवरील नावे जाहीर केली जाणार आहेत.'' पक्षाच्या निवडणूक तयारीबाबत पवार म्हणाले, ""मंत्र्यांवर एका लोकसभा मतदारसंघाची, तर आमदारांवर एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकलेली आहे.

संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी स्थानिक पातळीवर काम करतीलच, त्याचबरोबर मित्रपक्षांच्याही मतदारसंघामध्ये आमचा स्थानिक आमदार असेल, तर तिथे ते आमदारही प्रचारयंत्रणा राबवून काम करणार आहेत.

बाकी उर्वरित जागांवर काम करायचे आहे. जाहीरनाम्याचे काम सुरु आहे, लवकरच जाहीरनाम्याचेही काम पूर्ण होईल. स्थानिक महत्त्वाचे प्रश्‍न जाहीरनामा, परिचय पत्रकात केला जाणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप, अन्य घटक पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या याद्या तयार झाल्या आहेत.'' माढा, सातारा, नाशिकबाबत बुधवारी (ता.२७ ) होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.

बारामतीचा सस्पेन्स ठेवणार !

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी माध्यमांमधून अनेक नावे पुढे आली आहेत. मलाही संबंधित नावे ऐकून बरे वाटते. तुम्ही काळजी करू नका, बारामतीचा सस्पेन्स मी ठेवणार आहे. तुमच्या मनात जे नाव आहे, तेच नाव असणार आहे, असे सांगत पवार यांनी बारामतीच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले.

छगन भुजबळांना मत मांडण्याचा अधिकार आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकमधून निवडणूक लढविण्याचा विचार व्यक्त केला आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. त्यावर माझा कुठलाही आक्षेप नाही. आम्ही तिन्ही पक्षा त्याबाबत निर्णय घेऊ, असेही पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले

- मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे

- राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर असेल

- साताऱ्याच्या जागेबाबत उदयनराजे भोसले यांना भाजप समजावून सांगतील

- लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकतो.

- विजय शिवतारे यांच्या वक्तव्याबद्दल "नो कॉमेंट्स'

- कार्यकर्ते मते मांडू शकतात, निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठांना

- पाच वर्षांपूर्वी अमोल कोल्हे या उमेदवाराला मीच शोधून काढलेला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT