Reels sakal
पुणे

Pune News : ‘रिल’मुळे तरुणाला सापडली ‘माऊली’!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - समाज माध्यमे आणि ‘रिल्स’च्या मोहात लोकांचे जीव धोक्यात येण्याचे अन् नुकासन होण्याचे प्रकार अलीकडे पाहायला मिळत आहेत. मात्र याच ‘रिल्स’मुळे एका तरुणाला आपली हरवलेली आई सापडल्याची सुखद घटनाही नुकतीच घडली. सोलापूरच्या एका छायाचित्रकाराने पंढरपूरमध्ये चित्रित केलेले ‘रिल’ व्हायरल झाले आणि त्यातून मुंबईच्या तरुणाला हरवलेली आई सापडली.

त्याचे झाले असे की, शिवाजी धुते हे छायाचित्रकार गेल्या पाच वर्षांपासून सोलापूर ते पंढरपूर असा आषाढी वारीचा सोहळा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी जातात. यंदाही असेच ते पंढरपुरात असताना एका चिमुकल्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तो चिमुकला पावसापासून संरक्षण करणारे कापड विकत होता. त्याची धडपड धुते यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली. त्याचे रिल समाज माध्यमांवर टाकल्यावर बरेच ‘व्हायरल’ झाले.

हे रिल मुंबईतील एका तरुणाने आपल्या मित्राच्या अकाउंटवर पाहिले आणि तो चमकला. याच व्हिडिओत हा मुलगा ग्राहकांना पैसे परत देण्यासाठी एका महिलेकडे सुट्टे पैसे घ्यायला जाताना दिसतो. ती महिला म्हणजे काही दिवसांपूर्वी हरवलेली आपली आई असल्याचे या तरुणाच्या लक्षात आले. त्याने लगेचच हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या धुते यांचा संपर्क शोधून काढला आणि त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन आईचा शोध घेतला. दोन दिवसांतच या घडामोडी घडल्याने त्याच ठिकाणी तरुणाला आपली आई सापडली.

समाज माध्यमाच्या या ताकदीने एका तरुणाला आपली ‘माऊली’ परत भेटवली आणि ‘रिल’मुळे ताटातूट झालेले मायलेक परत भेटले. ‘‘मी आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून पूर्णवेळ छायाचित्रणाकडे वळलो आहे. पांडुरंगाने जणूकाही या प्रसंगाच्या निमित्ताने त्याचेच फळ दिले’, अशी प्रांजळ भावना या पुनर्भेटीला निमित्त ठरलेल्या शिवाजी धुते यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT