पुणे : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमापाठोपाठ विद्यार्थ्यांनी दहावीनंतरच्या तंत्र शिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाकडेही यंदा पाठ फिरविली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या 40 हजारांहून अधिक जागा रिक्त राहणार आहेत. दुसरीकडे औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी.फार्म) अभ्यासक्रमाला प्रवेश क्षमतेपेक्षा तिप्पट अर्ज आले आहेत.
तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार मिळतो; परंतु आता अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांचे प्रमाण अधिक असल्याने विद्यार्थ्यांना ही संधी मिळू लागली आहे. त्यामुळे अकरावी, बारावी करून थेट पदवीला प्रवेश घेण्यास विद्यार्थी आणि पालक प्राध्यान्य देतात. तसेच पदविकेनंतर स्पर्धात्मक परीक्षा देता येत नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागल्याचे तज्ज्ञ सांगतात.
तंत्र शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार म्हणाले, "पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार मिळतोच. तरीही या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत.''
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांचा कल कमीच आहे. या अभ्यासक्रमाच्याही 30 हजारांहून जागा रिक्त राहण्याचे सूतोवाच तंत्र शिक्षण संचालनालयाने केले आहे. पदवी घेतल्यानंतर रोजगार मिळेल याची खात्री नसल्याने ही स्थिती निर्माण होत असल्याचे संचालनालयातील अधिकाऱ्यांचे मत आहे. गेल्या दोन वर्षांपासून बारावीनंतर डी.फार्म. या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. या वर्षी तशीच परिस्थिती आहे. राज्यातील एकूण प्रवेश क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवेश अर्ज आले आहेत.
अभ्यासक्रम प्रवेश क्षमता प्रवेशासाठी अर्ज
दहावीनंतर पदविका 134849 57748
डी. फार्मसी 19793 65000
अभियांत्रिकी पदवी 140043 108313
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.