police suspended sakal
पुणे

Crime News : महिलेशी गैरवर्तन; सहाय्यक निरीक्षकासह तिघेजण निलंबित

मगरपट्टा सिटी पोलिस चौकीत एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि दामिनी पथकातील दोन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मगरपट्टा सिटी पोलिस चौकीत एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि दामिनी पथकातील दोन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी ही माहिती दिली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलिस कर्मचारी उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हडपसर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे हडपसर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ९) त्या महिलेला मगरपट्टा पोलिस चौकीत चौकशीसाठी बोलावले होते.

महिला पोलिसांसमक्ष तिची चौकशी करण्यात आली. महिलेला पुन्हा सायंकाळी साडेपाच वाजता हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ती महिला नातेवाइकांसह मगरपट्टा पोलिस चौकी आली. त्यावेळी या महिलेने तिला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली.

‘या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक दोरकर, पोलिस कर्मचारी सोनकांबळे आणि उदमले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असून, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल,’ असे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT