ajit pawar PDCC Bank ajit pawar
पुणे

PDCC Election |माजी अध्यक्षांना धक्का; पवार, दांगट, चांदेरे यांची बाजी

ओमकार वाबळे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी सात जागांची मतमोजणी येत्या आज सकाळी नऊ वाजल्यापासून पुण्यात सुरू आहे. या सात जागांसाठी १४ उमेदवार नशीब अजमावत आहेत. पुणे शहरातील लष्कर परिसरातील अल्पबचत भवनात ही मतमोजणी पार पडत आहे. (PDCC Bank Election Results)

पुण्यात पार पडत असलेल्या मतमोजणीत आमदार अशोक पवार, विकास दांगट, सुनील चांदेरे PDCC बँक निवडणुकीत विजयी झाले आहेत.पुणे जिल्हा बँकेवर (Pune District Central Cooperative Bank Election) तालुका मतदारसंघात पवार, दांगट, चांदेरे यांनी बाजी मारली आहे. (MLA Ashok Pawar) बॅंकेचे माजी अध्यक्ष म्हस्के, कलाटे यांना पराभवाचा धक्का बसल्याचा निकाल समोर आला आहे. त्यामुळे यंदा नव्या चेहऱ्यांना मतदारांची पसंती दिल्याचं दिसतंय. (NCP in PDCC Bank Election)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार (शिरुर), सुनील चांदेरे (मुळशी) आणि अपक्ष विकास दांगट (हवेली) यांनी माजी मारली आहे.

बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या तीनही मतदारसंघात मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली आहे.

हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचेच विकास दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत दांगट यांनी सुमारे १५ मतांनी विजय मिळवला आहे. म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दांगट यांना ७३ तर, म्हस्के यांना ५८ मते मिळाली आहेत.

शिरूरचे आमदार अशोक पवार हे ८६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना १३२ पैकी १०९ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार आबासाहेब गव्हाणे यांना २३ मते मिळाली आहेत.

मुळशी तालुका मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार सुनील चांदेरे विजयी झाले आहेत. त्यांनी बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांचा पराभव केला आहे. येथील एकूण ४५ मतांपैकी चांदेरे यांना २८ तर, कलाटे यांना १७ मते मिळाली आहेत.

शिरुर

अशोक पवार १०९ विजयी

गव्हाणे २१

मुळशी ४५

चांदेरे २७ विजयी

कलाटे १८

हवेली १३१

दांगट-७३ विजयी

म्हस्के-५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT