सोलापूरकरांवर अन्याय झाला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, तसेच राजकारणातून संन्याय घेईन, अशी भूमिका आमदार भरणे यांनी घेतली.
पुणे : सोलापूरचे पालकमंत्री आणि आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) आणि सोलापूरकरांमध्ये उजनी धरणातील (Ujani Dam) पाणी पळविल्याच्या मुद्यावरून चांगलंच वातावरण तापलंय. सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) पाच टीएमसी पाणी हे सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूर (Indapur) येथील प्रकल्पाला वळविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयावरून सोलापूर जिल्ह्यातील नेते आणि पालकमंत्री भरणे यांच्यात मोठा संघर्ष सुरू झालाय. हा निर्णय रद्द करण्यासाठी विविध संघटनांसह स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शविला असून विविध प्रकारची आंदोलने देखील करण्यात आली आहेत. पाच टीएमसी पाणी इंदापूरला गेल्यास एक आवर्तन कमी होणार असल्याने सोलापूर जिल्ह्याचे नुकसान होत असल्याची भावना सोलापूरकरांमध्ये पसरलीय. (MLA Dattatray Bharane comment about Ujani Dam water distribution)
गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री आणि सोलापूरकर यांच्यातील हा वाद विकोपाला गेल्यानं आता त्यात थेट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सिंचनभवनात याबाबत मंत्री दत्तात्रय भरणे आणि सोलापूरमधील शिष्ट मंडळ यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागलंय. सिंचनभवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, बैठकीला जाण्याअगोदर दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ''एक ठिपका पाणीही सोलापूरचं घेणार नाही, मात्र इंदापूरला ही पाणी कमी पडू देणार नाही. सोलापूरकरांवर अन्याय झाला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, तसेच राजकारणातून संन्याय घेईन, अशी भूमिका आमदार भरणे यांनी घेतली. उजनीच्या पाणी प्रश्नाबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, काहीजण याप्रश्नी निव्वळ राजकारण करत असल्याचा आरोपही भरणे यांनी केला.
उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी पळविल्याच्या मुद्द्यावरून पुण्यातील सिंचन भवनात बैठक पार पडतेय. भरणे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीला सिंचन विभागातील अधिकारी आणि सोलापूरचे शिष्ट मंडळ उपस्थित असणार आहे. उजनी धरणामध्ये आंदोलन केलेल्या आंदोलकांनाही या बैठकीला बोलावण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.