MLA Dattatraya Bharne Ajit Pawar esakal
पुणे

'इंदापुरात दुष्काळ स्थिती, खडकवासल्यातून तालुक्याला पाणी सोडा'; आमदार भरणेंची अजितदादांकडे मागणी

नैसर्गिक स्रोत यंदा लवकर आटल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट पडले असून पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत.

संतोष आटोळे

इंदापूर तालुक्याच्या अनेक भागात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जर खडकवासला कालव्यातून इंदापूरसाठी पाणी आले, तर तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता कमी होईल.

इंदापूर : इंदापूर तालुक्यात सध्या दुष्काळ परिस्थिती (Indapur Water Crisis) निर्माण झाली असून शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवत आहे, तसेच दुष्काळामुळे तालुक्याच्या विविध भागात शेतकऱ्यांची हाता-तोंडाशी आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे खडकवासल्यातून (Khadakwasla Dam) इंदापूरसाठी पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे.

याबाबतचे निवेदन हे उपमुख्यमंत्री पवार यांना दिले आहे. याबाबत माहिती देताना आमदार भरणे (Dattatray Bharane) म्हणाले, गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे जवळपास सगळीकडचेच नैसर्गिक स्रोत यंदा लवकर आटल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट पडले असून अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील ब-याच भागातील उन्हाळी पिके जळून चालली आहेत.

तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या गावोगावी निर्माण झाली आहे. यामध्ये विशेषतः तालुक्यातील शेटफळ गढे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी, वायसेवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, रूई, थोरातवाडी, मराडेवाडी, बोराटवाडी, कौठळी, बळपुडी, खामगळवाडी, बिजवडी, पोंदकुलवाडी, तरंगवाडी या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या या परिसरात पाण्याचे टँकर चालू आहेत. त्यामुळे दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन खडकवासल्यातून इंदापुरसाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री अजित पवारांना केली आल्याचेही भरणे यांनी सांगितले.

खडकवासला कालव्यातून पाणी आल्यास शेतकऱ्यांना दिलासा!

इंदापूर तालुक्याच्या अनेक भागात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जर खडकवासला कालव्यातून इंदापूरसाठी पाणी आले, तर तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता कमी होईल आणि बळीराजाला दिलासा मिळेल. यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाण्याबाबत आग्रही मागणी केली आहे.

-आमदार दत्तात्रय भरणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT