पुणे

पक्षातील 'दादां'ऐवजी विरोधक 'दादा' बरा

या आमदाराने थेट विरोधी पक्षातील ‘दादां’शी संपर्क साधला आणि त्यांच्या कानावर हा प्रकार घातला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या दवाखान्यांना (pune corporation hospital) आवश्‍यक ते साहित्य खरेदीसाठी शहरातील सर्व आमदारांनी (Pune MLA) एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला खरा, परंतु महापालिकेने एका आमदार वगळता अन्य सर्व आमदारांच्या निधीतून खरेदीला मान्यता देखील दिली. आमदार निधी देऊनही खर्ची टाकत नसल्यामुळे भडलेल्या या आमदाराने पक्षाच्या ‘दादां’ ऐवजी विरोधी पक्षातील ‘दादां’कडे धाव घेतली. कामात तप्तर असलेल्या त्या ‘दादां’नीही तत्काळ महापालिकेशी (corporation) संपर्क साधून त्या आमदाराची मदत केली. त्यामुळे महापालिका वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला होता.

आमदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी महापालिकांना देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार शहरातील सर्वच आमदारांनी आपल्या निधींतून आवश्‍यक ते साहित्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देत असल्याचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले. त्यानुसार एक आमदार वगळता अन्य आमदारांच्या निधीतून आवश्‍यक ती खरेदी करण्यासाठीच्या आवश्‍यक त्या मान्यता महापालिकेकडून देण्यात आली. मात्र, एका आमदाराच्या पत्राकडे प्रशासनाने डोळेझाक केली.

त्यांची माहिती त्या आमदाराला मिळाल्यानंतर त्या भडकल्या. वास्तविक ज्या पक्षाच्या त्या आमदार आहेत त्याच पक्षाची महापालिकेत सत्ता देखील आहे. तसेच पक्षाचे प्रमुख असलेले अन्‌ ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे आमदारही पुण्याचेच आहे. त्यांच्या कानावर हा प्रकार घालणे अपेक्षित होते. मात्र, या आमदाराने थेट विरोधी पक्षातील ‘दादां’शी संपर्क साधला आणि त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. विरोध पक्षातील या ‘दादां’ची कार्यपद्धती सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांनी देखील तत्काळ महापालिकेशी संपर्क साधला आणि त्याचा रिप्लाय देखील त्या आमदारांना दिला. त्यामुळे महापालिकेत हा चर्चेचा विषय झाला होता. महापालिकेतील पदाधिकारी आणि आमदार यांच्यातील वादामुळेच हा प्रकार घडला की काय अशी शंका बोलून दाखविली जात आहे.

MLA funds used issue opposition leader help pune MLA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT