MLA Sangram Thopte Sakal
पुणे

Mla Sangram Thopte : मे महिन्या पर्यंत वेल्ह्यातून कोकणात गाडी उतरविणार

स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड व दुसरी किल्ले रायगड रस्ता मार्गाने जोडले जाणार.

मनोज कुंभार

वेल्हे, (पुणे) - स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड व दुसरी राजधानी किल्ले रायगड या ऐतिहासिक स्वराज्याचा दोन्ही राजधान्या जोडल्या जाणारा व खऱ्या अर्थाने वेल्हे तालुक्याच्या विकासाचा मार्ग असणार्‍या भोर्डी (ता. वेल्हे) ते शेवते (ता. महाड) हा मार्ग वरून मे महिन्यापर्यंत कोकणात गाडी उतरविण्याचा निर्धार आमदार संग्राम थोपटे यांनी केला.

अठरागाव मावळ परिसरात आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन मंगळवार (ता. ९)रोजी करण्यात आले. यावेळी भोर्डी गावात ग्रामस्थांकडून आयोजित सत्कार प्रसंगी आमदार थोपटे बोलत होते.

वेल्हे तालुक्यासह पुणे जिल्ह्या कोकणाला जोडणारा सर्वात जवळचा मार्गास मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून २५ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधी, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५ कोटी रुपये असा एकूण ३० कोटी ३२ लाख रु. निधी मंजूर झाला आहे.

तर संशोधन आणी विकास विभागाकडे ४ कोटींची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या भोर तालुक्यातून वरंध घाट, तर मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटमार्गे रायगड जिल्ह्यात जाता येते. आता नव्याने वेल्हे तालुक्यातून रस्ता होणार असल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

गेली अनेक वर्षे वेल्ह्यातून महाडला जोडणारा रस्ता करावा, यासाठी नागरिकांची मागणी होती. आणि त्यासाठी आमदार संग्राम थोपटे सातत्याने प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, सदर रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून या कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून वेल्हा तालुक्यातील जाधववाडी ते कोलंबी नाळवट रस्त्या करणे रु. २ कोटी ३ लक्ष २८ हजार, व स्मशानभूमी बांधणे रु. १० लक्ष, कोंढाळकर वाडी येथील रस्ता करणे रु.६० लक्ष,

बालवड येथे सामाजिक सभागृह बांधणे रु. १५ लक्ष, बर्शिमाळ रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करणे व सामजिक सभागृह बांधणे रु. १ कोटी ५१ लक्ष व जल जीवन मिशन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना करणे रु. ४८ लक्ष, पासली येथे तलाठी कार्यालय बांधणे रु. २५ लक्ष जल जीवन मिशन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना करणे रु. ७६ लक्ष व पासली आरोग्य केंद्र दुरुस्ती करणे रु. १० लक्ष, भोर्डी येथील लघुपाट बंधारा बांधणे रु. ५० कोटी १५ लक्ष, बौध्दवस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे रु. ५ लक्ष, सिंगापूर येथील लिंगाणा किल्याकडे जाणारा रस्ता करणे रु. १० लक्ष, कोलंबी येथील बंधारा बांधणे रु. ४५ लक्ष, हारपूड येथील प्र. जि. मा. ४३ हारपूड ते ब्राम्हणखिंड ग्रामा ८३ रस्ता करणे रु. २० लक्ष, अंतर्गत रस्ता करणे रु. ५ लक्ष, जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना करणे रु. ३० लक्ष ८५ हजार, वरोती येथील लघुपाट बंधारा बांधणे रु. २९ कोटी ५८ लक्ष या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.

प्रसंगी वेल्हा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नाना राऊत, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक संदीप नगीने, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, राजगडच्या जेष्ठ संचालिका शोभा जाधव, माजी सभापती दिनकर सरपाले, सिमा राऊत, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, सेवादल अध्यक्ष आकाश वाडघरे, उपाध्यक्ष गणेश जागडे, वांगणीचे उपसरपंच शिवाजी चोरघे, मार्गासनी गण अध्यक्ष राजकुमार आलगुडे, मार्गासनीचे माजी सरपंच विशाल वालगुडे, भोर विधानसभा कॉंग्रेस युवक अध्यक्ष अमोल पडवळ, कार्याध्यक्ष नीलेश पवार, सागर मळेकर, रोहिदास पिलाणे, अशोक कुमकर, शिवाजी पोटे, धोंडिबा ढेबे, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग बहूसंखेने कार्यक्रमास उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT