राज ठाकरेंनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यापूर्वी पुण्यात सभा घेऊन रणशिंग ते फुंकणार असल्याचं बोललं जात होतं. डेक्कन भागातील भिडे पुलाजवळील नदी पात्रात ही सभा घेणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी या सभेसाठी तयारीही सुरू केली होती. यानंतर राज ठाकरे पुण्यात दाखल झाले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मात्र अचानक त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. मात्र, ठाकरे यांच्या तब्येत बिघडल्याने सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. (Raj Thackeray in Pune)
दरम्यान, ठाकरे मुंबईकडे निघताच पुण्यातील पदाधिकाऱ्यांची अंतर्गत खदखद बाहेर आली. (Pune MNS)
पुण्यात मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात राडा झाला. काल रात्री उशिरा कार्यालयात गोंधळाला सुरुवात झाली. आणि त्याचं पर्यवसन हमरी तुमरीत झालं. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.
विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर आणि शिरोळे यांच्यात वादाला सुरुवात झाली. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष आहेत. मात्र पक्षाच्या कोणत्याही बैठकांना का बोलावलं जात नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे संतापले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. यातून कार्यकर्तेही तापले आणि राड्याला सुरुवात झाली. पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व पदाधिकारी यांच्यासमोरच वाद झाला.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर
मागील अनेक दिवसांपासून पुण्यात मनसेच्या गोटात काही नेत्यांची नाराजी आहे. याआधी वसंत मोरे पक्ष सोडणार असल्याची परिस्थिती होती. त्यांना तत्काळ शहराध्यक्षपदावरून बाजूलाही करण्यात आलं. अद्याप मनसेत अंतर्गत खदखद सुरू आहे. यासाठी नेत्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार होते. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्याने सभाही देखील रद्द झाली. पण राज ठाकरे मुंबईला पोहोचण्याआधीच मनसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.