Modern-cremation 
पुणे

रावेतमध्ये साकारतेय अत्याधुनिक स्मशानभूमी

ज्ञानेश्वर भंडारे

वाल्हेकरवाडी - रावेतकरांना बहुप्रतीक्षित असलेल्या स्मशानभूमीच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक ३२ अ मधील जाधव घाटाजवळच्या आरक्षित जागेवर अत्याधुनिक गॅसवरील शवदाहिनीसह स्मशानभूमी विकसित होणार आहे. मात्र या जागेजवळील सोसायट्यांमधील नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे.

रावेत, प्राधिकरण, शिंदे वस्ती, वाल्हेकरवाडी आदी भागांतील नागरिकांना रावेत येथील पंपिंग स्टेशन, निगडी किंवा चिंचवड येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जावे लागते. पण तेथे अपुऱ्या सोयीसुविधांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या नव्या स्मशानभूमीमुळे येथील स्थानिकांना दिलासा मिळणार आहे. या स्मशानभूमीत वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणा असेल. या कामाची जबाबदारी महापालिकेकडे असेल. तर या कामाचा खर्च प्राधिकरण करणार असून, दीड वर्षात हे काम पूर्ण होईल. सीमाभिंत, रस्ते, इमारत, मुख्य प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, सुरक्षारक्षक, अंतर्गत सजावट यांचा समावेश आहे.

नागरिकांचा विरोध 
स्मशानभूमी ही परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी असली, तरी तिला शेजारील ला कासीटा, पवनी प्राइड, हार्मोनी, ध्रुव सिद्धी, रॉयल व्हिजन, ब्लूमिंग डिल, रिद्धी सिद्धी या सोसायट्यांचा विरोध आहे. या सोसायट्यांमध्ये सुमारे दोन हजार नागरिक राहतात. 

स्मशानभूमी दृष्टिक्षेपात...
 क्षेत्र - ९ हजार चौरस मीटर 
 मुदत - १.५ वर्षे
 खर्च  - ४ कोटी ६२ लाख

या कामाला सुरवात झाली असून, निविदा काढून ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. ठेकेदाराला दीड वर्षाची मुदत दिली आहे. भूसंपादन झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे.
- हरविंदरसिंग बन्सल, अभियंता, स्थापत्य विभाग

स्मशानभूमीला चोहोबाजूंनी 
उंच संरक्षण भिंत बांधणार आहोत. तशी सूचना महापालिकेला दिली आहे. 
- सतीशकुमार खडके, मुख्य अधिकारी, प्राधिकरण

परिसरात अत्याधुनिक स्मशानभूमी होत आहे. ही सर्वांसाठी चांगली गोष्ट असली तरी स्थानिकांना त्याचा त्रास होत असेल, तर माझाही याला विरोध असेल. 
- मोरेश्‍वर भोंडवे, नगरसेवक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT