Rain-Environment sakal
पुणे

Monsoon : पुढील आठवड्यात पुण्यासह राज्यात पावसाला पोषक वातावरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बंगालच्या उपसगारात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह राज्यातच पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. पुण्यात शनिवारी दिवसभरात अनेक ठिकाणी अती हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. पुढील आठवडाभर मॉन्सून पुन्हा सक्रीय होत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शनिवारी दिवसभर आकाश अंशतः ढगाल होते. दुपारनंतर मात्र आकाशात ढगांची गर्दी झाली. संध्याकाळी बहुतेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. शहरात सरासरी ०.५ मिलिमीटरपेक्षा कमी पावसाने हजेरी लावली. पुढील आठवडाभर तरी शहर व जिल्ह्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहूण, अति हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत आला आहे. मॉन्सूनचा आस गंगानगर, नार्नुल, दातिया, सताना, कमी दाबाचे केंद्र, बालासोर आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

राज्याचा अंदाज -

राज्यात ढगाळ हवामान होत आहे. उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २० विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Fire: नुकत्याच उद्घाटन झालेल्या 'मंडई मेट्रो' स्थानकाला भीषण आग! अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी; आग नियंत्रणात

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT