pune  Sakal
पुणे

पुणे : क्षेत्रीय कार्यालयांचा अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला ठेंगा

पहिल्याच पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्याने ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत रस्त्यांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : शहरातील १२ मीटर पेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांना खड्डे पडल्याने क्षेत्रीय कार्यालयांनी दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड-डीएलपी) रस्त्यांची माहिती सादर करा असे लेखी आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले. त्यानंतर पथ विभागाकडून दोन वेळा क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, परिमंडळाचे उपायुक्त यांना स्मरणपत्र पाठवून देखील १५ पैकी पाच क्षेत्रीय कार्यालयांनी माहिती दिलीच नाही. त्यामुळे आदेशाला ठेंगा दाखविणाऱ्या या सहाय्यक आयुक्तांना नोटीस बजावून कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेने पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडू नये त्याआधी रस्ते दुरुस्ती केली होती. पण पहिल्याच पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले. ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत रस्त्यांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला. मात्र, केवळ मुख्य पथ खात्याच्या अखत्यारित असलेल्या १३९ डीएलपी रस्त्यांचा हा अहवाल सादर करण्यात आला. त्यातही केवळ १७ रस्त्यांवरच जास्त खड्डे पडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

शहरातील गल्लीबोळातील लहान रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे, पण हे रस्ते क्षेत्रीय कार्यालयांच्या ताब्यात असल्याने त्याबाबत मुख्यखात्याकडून कारवाई झाली नाही. हा मुद्दा समोर आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त खेमणार यांनी गेल्या तीन वर्षात केलेल्या व डीएलपी मध्ये असलेल्या रस्त्यांची माहिती पाठवा असे आदेश २८ जुलै रोजी दिले होते. हा आदेश दिल्यानंतर १५ पैकी १० क्षेत्रीय कार्यालयांनी १ हजार ३२५ डीएलपी मधील रस्त्यांची माहिती सादर केली आहे.

माहिती न देणारे पाच क्षेत्रीय कार्यालय

नगररस्ता-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय, येरवडा-धानोरी-कळस क्षेत्रीय कार्यालय, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय, धनकवडी-सहकारनगर आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय या पाच कार्यालयांनी गेल्या २० दिवसात माहिती सादर केलेली नाही. या क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना आदेश देऊनही त्यांनी माहिती सादर करण्यास टाळाटाळ केली आहे.

‘‘क्षेत्रीय कार्यालयांनी काम केलेल्या ‘डीएलपी’तील रस्त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. पण १५ पैकी १० कार्यालयांनी माहिती दिली आहे. ज्या ५ कार्यालयांनी माहिती दिली नाही, त्यांच्याकडून ती माहिती घेतली जाईलच, पण माहिती देण्यास उशीर का केला ? याची कारणे दाखवा नोटीस सहाय्‍यक आयुक्तांना बजावून कारवाई केली जाईल. अशी उदासीनता खपवून घेतली जाणार नाही.’’

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त

सिंहगड रस्ता परिसरात सर्वाधिक कामे

१० क्षेत्रीय कार्यालयांनी गेल्या तीन वर्षात काम केलेल्या १ हजार ३२५ ‘डीएलपी’तील रस्त्यांची माहिती सादर केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कामे हे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत झाली असून, याठिकाणी ६५१ रस्ते डीएलपीतील आहेत. त्याच प्रमाणे औंध बाणेर ९३, शिवाजीनगर-घोले रस्ता ११, कोथरूड-बावधन ८१, वारजे कर्वेनगर १५०, हडपसर-मुंढवा ५८, वानवडी-रामटेकडी ६८, कोंढवा येवलेवाडी ११०, कसबा विश्रामबाग ५१, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात ५२ रस्ते डीएलपीतील आहेत. या पैकी काही रस्त्यांची निवड करून त्यांचा दर्जा तपासला जाणार आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

SCROLL FOR NEXT