Pune Metro sakal
पुणे

पुणे मेट्रोचे बहुतांश काम डिसेंबरअखेर होणार पूर्ण

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाला अवघ्या चार महिन्यांत बूस्टर मिळणार आहे.

मंगेश कोळपकर

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाला अवघ्या चार महिन्यांत बूस्टर मिळणार आहे.

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाला अवघ्या चार महिन्यांत बूस्टर मिळणार आहे. दोन्ही शहरांतील बहुतांश मेट्रो प्रकल्पाचे काम डिसेंबअखेर जाहीर होणार असल्याचे महामेट्रोने शुक्रवारी जाहीर केले.

शहरात पिंपरी चिंचवड - स्वारगेट आणि वनाज- रामवाडी दरम्यान ३१ किलोमीटरचे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यातील पिंपरी - फुगेवाडी आणि वनाज- गरवारे कॉलेज दरम्यान मेट्रोचे ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. या बाबत महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ म्हणाले, ‘डिसेंबरपर्यंत बहुतांश मेट्रो मार्ग आणि स्थानकांचे काम पूर्ण होईल. हे काम डिसेंबरपूर्वीच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पाऊस वाढल्यास वेळापत्रकात बदल होऊ शकतो. परंतु, डिसेंबरमध्ये मेट्रोची कनेक्टिव्हीटी नक्कीच वाढेल.’

सुरू असलेल्या मेट्रो मार्गांचे काम केव्हा पूर्ण होणार, या बाबत निश्चित माहिती जाहीर करावी, अशी मागणी मराठा चेंबर कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष सुधीर मेहता यांनी केली होती. त्याला उत्तर देताना महामेट्रोने रामवाडी- शिवाजीनगर न्यायालय, गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान मेट्रो मार्गाचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण होईल, असे स्पष्ट केले आहे.शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पासाठी ११ हजार ४०० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

मेट्रोचे विस्तारीत मार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत

मेट्रोचा विस्तार आता वनाज- चांदणी चौक दरम्यान होणार आहे. त्यासाठीचा प्रकल्प अहवाल महामेट्रोने महापालिकेला नुकताच सादर केला आहे. त्यासाठी सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. तर स्वारगेट- कात्रज दरम्यान भुयारी मेट्रो होणार असून त्यासाठी ७ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबंत आहे.

रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान सुमारे ६ किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी असेल. या मार्गाच्या दोन्ही बोगद्यांचे काम वेगाने सुरू आहे. त्यात सध्या लोहमार्ग टाकण्यात येत आहे. त्यावर सिग्नल यंत्रणा बसविण्यात येईल. त्यानंतर मुख्य नियंत्रण कक्षाशी ते जोडले जातील. रेल्वे सुरक्षा मंडळाने त्याला मान्यता दिल्यावर भुयारी मेट्रो कार्यान्वित होईल. भुयारी मेट्रो मार्गाचे काम पुढील वर्षी मार्चअखेर पूर्ण होणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT