murder sakal
पुणे

Pune Crime : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून आईचा खून

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून ३० वर्षीय मुलाने आणि नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलाने बेदम मारहाण करून वृद्ध महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध आईचा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.

मंगल मोहन नेटके (वय ६०, रा. कामराजनगर, येरवडा) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा मुलगा मयूर मोहन नेटके व अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बहिणीच्या मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नेटके या कामराजनगरमध्ये मुलासोबत राहण्यास होत्या. त्या घरगुती कामे करत. तसेच, एका कार्यालयात देखील साफ सफाईचे काम करत होत्या. त्या कार्यालयाकडून त्यांचा पगार झाला होता. त्याचे पैसे त्यांच्याकडे होते.आर्इचा पगार झाल्याचे समजल्यानंतर मयूर याने नेटके यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते.

परंतु, आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग मयूरच्या डोक्यात होता. त्याने नातेवाईक मुलासोबत आईला बेदम मारहाण केली. त्यात नेटके गंभीर झाल्या. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी (ता. १५) मृत्यू झाला.

आचाऱ्याचा खून -

हांडेवाडी-सय्यदनगर रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमधील आचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिस तपासातून त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे. राजेंद्र रामभाऊ शेजूळ (वय ३५, रा. उंड्री) असे खून झालेल्या आचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी भाग्यश्री शेजूळ (वय २९) यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ ते १२ मे दरम्यान हांडेवाडीतील रिदम सोसायटीच्या परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजूळ हे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होते. राजेंद्र यांचा रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने एका तरुणाचा अज्ञात कारणावरून डोक्यात व शरीरावर धारदार हत्याराने वार करून खून केला. खूनामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT