Motor vehicle collision intent to kill incident occurred Nanded village Pune-Panshet road Sakal
पुणे

Pune Crime : जीवे मारण्याच्या उद्देशाने, दुचाकीस मोटारीची धडक; पुणे- पानशेत रस्त्यावर नांदेड गावाच्या हद्दीतील घटना

जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने दुचाकीस मोटारीने जाणूनबुजून धडक दिल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पानशेत रस्त्यावर नांदेडच्या हद्दीत घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने दुचाकीस मोटारीने जाणूनबुजून धडक दिल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पानशेत रस्त्यावर नांदेडच्या हद्दीत घटना घडली.

शनिवारी रात्री साडेनऊ वाजता शिवम उर्फ चिक्या अनंत बरीदे (वय २३, रा.खडकवासला) हा त्याचे मोटार सायकलने नऱ्हाकडे जात होता. त्यावेळी अजय नेटकेने पाठीमागून मोटारीने येऊन धडक दिली.

याप्रकरणी, चिक्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. मोटरसायकलला पाठीमागून मुद्दाम धडक देऊन खाली पाडले. त्यास जखमी केले. त्यावेळी चिक्या बरीदे याने अजय नेटके व त्याच्या तीन साथीदारांना ओळखले.

त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मुद्दाम धडक दिली. त्यास पाडले दुखापत केली. हे लक्षात येताच चिक्याने तात्काळ डायल ११२ यावर कॉल करून पोलीस मदत मागितली. हवेली पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत शिंदे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहून अजय संतोष नेटके व त्याचे 3 साथीदार व त्या ठिकाणाहून वाहन सोडून पळून गेले.

हवालदार शिंदे यांनी चिक्याला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यास मारणार्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यास आज जखमी केल्याचे चिक्याने सांगितले. हवालदार शिंदे यांनी धडक देणाऱ्या मोटारीची पाहणी केली असता, मोटारीतील मागील सीटवर पोत्यामध्ये चार धारदार कोयते आढळले.

त्यानंतर शिंदे यांनी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सचिन वांगडे यांना माहिती दिली. पोलिस वांगडे व अन्य अधिकारी कर्मचारी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गुन्हयातील आरोपींचा उद्देश व गांभीर्य लक्षात घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे सचिन वांगडे यांनी आरोपींचा शोध सुरु केला.

यासाठी अन्य अधिकारी व पोलीस अंमलदार यांची तात्काळ दोन तपास पथके तयार करून वर नमूद आरोपींचा संपूर्ण रात्रभर शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले आहे. अन्वये आरोपी नामे अजय नेटके, व इतर तीन विधी संघर्ष ग्रस्त बालक यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हयातील आरोपींचा रात्री कोंबिंग ऑपरेशन करून शोध घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT