Mount Everest sakal
पुणे

Mount Everest: मंचरच्या तरुणांनी करुन दाखवलं; एव्हरेस्टच्या बेस कँम्पवर १७ हजार ६०० फुटांची केली यशस्वी चढाई!

डी. के. वळसे पाटील

Pune Success Story : “कुठल्याही अवघड यशाला अनेकदा एव्हरेस्टची उपमा दिली जाते. प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी एव्हरेस्ट सर करावं. पण एव्हरेस्टच्या बेस कँम्पवर १७ हजार ६०० फुट अंतराची चढाई किती खडतर ठरू शकते. याचा साक्षात अनुभव मी व माझा मित्र सचिन निघोट यांनी घेतला आहे.

आम्ही एव्हरेस्टच्या पायथ्याजवळ पोहोचलो होतो. दमलो होतो. थंडी व वाऱ्यामुळे असह्य होत होते पण चालत होतो. आमच्या हिमालयन वंडर्सच्या ग्रुपने जगातलं सर्वात उंच एव्हरेस्ट शिखरचा बेस कँम्प सर केल्यानंतर तो आनंद जीवनातील सर्वोच्च होता.” असे मंचर येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गिर्यारोहक सचिन काजळे यांनी सांगितले.

गेल्या आठ-दहा वर्षांपासून “मंचर हायकर्स”या ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून मंचर व आजूबाजूच्या परिसरातील काजळे व निघोट महाराष्ट्रातील गड,किल्ले, उंच पर्वत व शिखरे सर करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापारून एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक करावा अशी इच्छा होती. यावर्षी ती संधी मिळाली. मी व सचिन निघोट “हिमालयन वंडर्स” या नेपाळमध्ये स्थित ट्रेकिंग कंपनीबरोबर ट्रेक करण्याचे ठरविले. दोन महिन्यापासून शारीरिक व मानसिक तयारी सुरू केली.

रोज पहाटे स्विमिंग,सायकलिंगला योगा व प्राणायामची जोडी दिली. समुद्रा सपाटीपासून दोन हजार ६१० मीटर वरून ट्रेक सुरू केला.पाच हजार ३६४ मीटरला असणाऱ्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला नवव्या दिवशी पोहोचलो. साधारणपणे बारा हजार ५०० फूट उंचीवर गेल्यानंतरच ऑक्सिजनचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात झाली. श्वसनाला त्रास सुरू होतो, डोकेदुखी, मळमळ, भूक मंदावणे इत्यादी बदल शरीरात व्हायला सुरू होते.

परंतु या सर्व परिस्थितीशी समरूप होऊन नवव्या दिवशी १७ हजार ६०० फूट उंचीवर बेस कॅम्पला पोहचलो. त्यावेळी हवेतील ऑक्सिजन अतिशय विरळ झाला होता.निर्माण झालेल्या परस्थितीवर मात करून भारताचा तिरंगा निघोट व मी फडकवल्यानंतर जीवनात मिळालेला तो सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. येताना मात्र भरभर तीन दिवसात खाली उतरलो.

“एव्हरेस्ट शिखरचा बेस कँम्प ट्रेकमध्ये अतिउंचीवरील हवामानामुळे शरीराला होणारा त्रास हा अनेकदा महागात पडू शकतो. प्रत्येक मुक्कामागणिक आपण जास्त उंचीवर जात असल्याने प्राणवायूची कमतरता जाणवते. त्यामुळे डोके दुखणे, चक्कर, उलटय़ा आदी आजारांना सामोरे जावे लागते. याचा त्रास वाढल्यास हे आजार जीवघेणेही ठरू शकतात. म्हणूनच ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकच्या आधी उत्तम शारीरिक तयारी आवश्यक ठरते.”

सचिन काजळे, गिर्यारोहक मंचर (ता.आंबेगाव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT