Leshpal Jawalage sakal
पुणे

Pune News : शिक्षण, आरोग्य सुधारणेसाठी राज्यभर चळवळ उभारणार - लेशपाल जवळगे

सरकारी नोकरी न करण्याचा लेशपाल जवळगे यांचा निर्धार

गजेंद्र बडे

पुणे - राज्यातील दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आढेगाव (ता. माढा) या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. पोरानं शिकून मोठा साहेब व्हावे, हे माझ्या आई-वडीलांचे स्वप्न होतं. त्यातून मोठा साहेब होण्यासाठी पुणे शहर गाठलं. येथे पहिल्यांदा यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) शाखेची पदवी मिळविली आणि मोठा साहेब होण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरु केला.

पण, सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षा या केवळ एक मृगजळ बनल्या आहेत. यातून अनेक विद्यार्थी हे दिवसेंदिवस नैराश्‍यात जाऊ लागले आहेत. या विद्यार्थ्यांना आता नैराश्‍यातून बाहेर काढण्यासाठी राज्यभर नवी चळवळ सुरु करणार असल्याचे लेशपाल जवळगे सांगत होते. या चळवळीला पूर्णवेळ देता यावा, यासाठी आता सरकारी नोकरी करणार नसल्याचा निर्धारही जवळगे यांनी केला आहे.

या चळवळीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य सुविधांच्या सुधारणांसाठी आणि पुण्यासारख्या महागड्या शहरात वर्षानुवर्षे राहून विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आता सरकारच्या अनास्थेमुळे नैराश्‍यात जाऊ लागले आहेत. यापैकी अनेक जणांना करियरच्या चिंतेने ग्रासले आहे. कोणाचे वडील तर, कोणाची आई निरक्षर.

त्यातही वर्षभर शेतीत राब-राब राबायचे आणि पोटाला चिमटा घेऊन पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या पोराला दर महिन्याला पैसे पुरवायचे. आई-वडील हे केवळ आपला पोरगा केव्हा ना केव्हा मोठा साहेब होणार, या आशेने हे करत आहेत.

पण सरकारी धोरणांमुळे साहेब होता येईना, परत गावी जाता येईना, परत गेलो तर, आतापर्यंत झालेल्या मोठ्या खर्चाचा कचरा होणार आणि पुण्यात राहिलो तर, आणखी पैसे खर्च करावे लागणार आणि हे पैसे खर्च करूनही साहेब होणारंच, याचीही खात्री नसल्याने, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पूर्ण खचून गेले आहेत.

या विद्यार्थ्यांना आता कोणी तरी भावनिक आधार देण्याची गरज आहे. त्यामुळेच राज्यभर ही नवी चळवळ उभारण्याचा निर्धार केला असल्याचे जवळगे यांनी स्पष्ट केले.

पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदाशिव पेठेत एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २७ जून २०२३ रोजी एका महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने खुनी हल्ला केला होता. या खुनी हल्ल्यातून त्या तरुणीला जवळगे आणि त्यांच्या मित्रांनी वाचवले होते आणि त्या हल्लेखोर तरुणालाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांनी पक्षाचे काम करण्याबाबत विचारणा केली होती.

परंतु आपला पिंड राजकीय नसल्याने मी त्यास नकार दिला. त्यानंतर समाजातील अनेक नामवंत व्यक्ती, संस्था, संघटना, महाविद्यालयीन युवती, महिला आदींनी समाजासाठी काम करण्याची विनंती केली. यामुळे नोकरी मिळवून सरकारी व्यवस्थेत गुंतून पडण्यापेक्षा या व्यवस्थेच्या बाहेर राहून समाजासाठी काम करण्याचा निर्णय जवळगे यांनी घेतला आहे. लेशपाल जवळगे यांची नुकतीच वंदे मातरम विद्यार्थी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावा-गावांत शिक्षण, आरोग्य या थेट समाजाच्या विकासाशी निगडित असलेल्या विषयांवर वंदे मातरम विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून लोकचळवळ उभी केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तरुणांची फळी उभी केली जाणार आहे.

- लेशपाल जवळगे, राज्य अध्यक्ष, वंदे मातरम विद्यार्थी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT