amol kolhe 
पुणे

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमोल कोल्हे मैदानात 

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : चक्री वादळ व गारपिटीने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याबाबत कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना सूचना केली जाईल, असे अश्वासन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.

खासदार डॉ. कोल्हे, आमदार अतुल बेनके यांनी आज सकाळी नुकसानग्रस्त येडगाव (ता. जुन्नर) परिसराची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत डॉ.कोल्हे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, ग्रामनेते गुलाबराव नेहेरकर, सरपंच नरेश नेहेरकर, देविदास भोर, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी गुलाबराव नेहरकर म्हणाले की, येडगाव परिसरात १३ मे रोजी गारपीट व वादळी पाऊस झाला. ३ जून रोजी पाऊस, चक्री वादळ झाले. त्यामुळे या भागांतील फळभाजीपाला पिकांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने द्राक्ष पिकांच्या  नुकसानीचे पंचनामे केले नाहीत. चक्री वादळाचा फटका तालुक्यातील सुमारे तीन हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांना बसला आहे. मागील दोन वर्षापासून द्राक्ष उत्पादक अडचणीत आहेत. इतर पिकांप्रमाणे द्राक्ष पिकांची नुकसान भरपाई मिळावी. 

आमदार बेनके म्हणाले की, चक्री वादळाने तालुक्यातील शेती पिकांचे, मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
बहुवार्षिक फळ बागांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा व नुकसानग्रस्त घरांना दुरुस्तीसाठी वाढीव आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT