MP Dr. Amol Kolhe esakal
पुणे

Amol Kolhe : 'रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणाऱ्या अज्ञात 'ड्रोन'ची नागरिकांत दहशत, गृहमंत्र्यांकडून स्पष्टीकरण नाहीच'

सुदाम बिडकर

खासदार डॉ. कोल्हे यांनी ड्रोनबाबत प्रशासनास पत्र दिलेय. ही बाब गंभीरपणे घेत असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले आहे.

पारगाव : शिरूर लोकसभा मतदारसंघामधील (Shirur Lok Sabha Constituency) ग्रामीण भागातील काही गावात मागील तीन आठवड्यांपासून रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणाऱ्या अज्ञात ड्रोनमुळे (Drone Camera) नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वारंवार चौकशी करण्याची मागणी करूनही प्रशासन गांभिर्याने दखल घेत नाही. यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन देऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी, खडकवाडी, धामणी, पहाडदरा, अवसरी बुद्रुक, जारकरवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, अवसरी खुर्द, वडगाव काशिंबेग या गावात तसेच शिरूर व हवेली तालुक्यातील काही गावांत मागील तीन आठवड्यांपासून रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन उंचावरून घिरट्या घालत आहे. कधी-कधी ड्रोनची संख्या चार पर्यंत असते. काही ठराविक घरांवर वारंवार होणाऱ्या ड्रोनच्या घिरट्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

काही गावातील नागरिकांनी या ड्रोनचे व्हिडिओ काढले आहेत. हे ड्रोन कोणाचे आहेत ते कशाबद्दल उडवले जात आहेत, या बाबत प्रशासन व पोलीस स्टेशनमध्ये नागरिक चौकशी करत आहेत. परंतु, वारंवार चौकशी करण्याची मागणी करूनही प्रशासन गांभिर्याने दखल घेत नाही. रात्रीच्या वेळी ड्रोन दिसल्यास तरूण एकत्र येऊन ड्रोनचा पाठलाग करतात.

MP Dr. Amol Kolhe

परंतु, ड्रोनची उंची जास्त असल्याने ते हाती लागत नाही. खासदार डॉ. कोल्हे यांनी ड्रोनबाबत प्रशासनास पत्र दिलेय. ही बाब गंभीरपणे घेत असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले आहे. यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन देऊन स्पष्टीकरण द्यावे, अशा प्रकारची मागणी मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले, पूजा वळसे पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT