Muralidhar Mohol ESakal
पुणे

Pune News: सभा आटपून निघाले, पोलिसांच्या ताफ्यात दिसला जुना मित्र, गाडी थांबवली अन्... मोहोळ यांच्या कृतीची सर्वत्र चर्चा

Vrushal Karmarkar

आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या बालपणीच्या मित्रांना विसरत नाही. अशा मित्रा सोबत आपली कधी अनपेक्षित भेट झाली तर तेव्हा वाटणारा आनंद व्यक्त न करण्याजोगाच... असंच काहीसं घडलं खासदार मुरळीधर मोहोळ यांच्यासोबत. पुण्यात ते एका कार्यक्रमावरून परतत असताना त्यांच्या संरक्षणासाठी आलेल्या पोलिसांच्या ताफ्यात मुरळीधर मोहोळ यांना त्यांचा एक मित्र दिसला. त्यांनी लगेच गाडी थांबवून मित्राची भेट घेतली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मुरळीधर मोहोळ हे पुण्यातील चंदगड येथे एका कार्यक्रमाला गेले होते. शिवाजी पाटील यांच्या मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे सभा घेण्यात आली. ही सभा आटपल्यानंतर मुरळीधर मोहोळ पुन्हा परतत होते. यावेळी एका ट्रॅफिक पोलिसाला पाहून त्यांनी गाडी अचानक थांबवली. त्यानंतर गाडीतून उतरून त्या ट्रॅफिक पोलिसाची भेट घेतली. यावेळी सगळे त्यांच्या या कृतीकडे पाहत राहिले. हा पोलीस कर्मचारी दुसरे कुणी नसून मुरळीधर मोहोळ यांचे मित्र शहाजी पाटील होते.

शहाजी पाटील हे मुरळीधर मोहोळ यांच्या कोल्हापुरातील तालमीतील मित्र आहेत. शहाजी पाटील दिसताच त्यांनी लगेच गाडी थांबवली. त्यानंतर दोन जुन्या मित्रांची रस्त्यातच भेट झाली. यातून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा आला आहे. दोन्ही मित्र वेगवेगळ्या प्रकारे देशाची सेवा करत आहेत. मात्र तेव्हा दोघांनीही आपलं पद बाजूला ठेऊन जुनी मैत्री आठवत एकमेकांची गळाभेट घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

तर दुसरीकडे ज्यावेळी एखाद्या मंत्र्यांच्या बंदोबस्ताला पोलीस दलातील एक हवालदार सॅल्यूट मारण्यासाठी उभा असतो. मात्र तोच मंत्री जेव्हा काच खाली घेतो आणि नंतर गाडीतून उतरून या हवालदाराचा सॅल्यूट बाजूला ठेऊन त्याची गळाभेट घेतो, हे दृश्य दुर्मिळ पाहायला मिळतं. तसाच हा प्रसंग होता. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच या दोघांच्या भेटीत त्यांनी फोटो काढले आहेत. तसेच हसत हसत एकमेकांचा निरोप घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

Pune Crime : सिंहगड रस्ता परिसरात बांबू आणि दगडाने बेदम मारहाण करून तरुणाचा खून

SCROLL FOR NEXT