Pune  sakal
पुणे

Pune : समस्या सोडविण्यासाठी खासदार पालिकेत;पाठपुरावा करूनही प्रशासनाडून दाद मिळत नसल्याने घेतल्या बैठका

पुणे महापालिकेची निवडणूक न झाल्याने गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक न झाल्याने गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मात्र प्रश्‍न सोडविले जात नाहीत. वारंवार पाठपुरावा होऊनही दाद मिळत नसल्याने नागरी समस्या सोडविण्यासाठी खासदारांनाच महापालिकेत येऊन प्रश्‍नांवर चर्चा करावी लागत आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर महापालिकेत शहरातील प्रश्‍नांवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतंत्रपणे बैठका घेतल्या.

महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत मार्च २०२२मध्ये संपली. त्यानंतर निवडणुका झालेल्या नाहीत. महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील नगरसेवकांचा दुवा नसल्याने प्रभागांतील समस्या वाढत आहेत. पाणीटंचाई, ड्रेनेज तुंबणे, कचरा न उचलला जाणे, पथदिवे बंद पडणे, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुविधा न मिळणे, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे याबाबत तक्रार करण्यासह अनेक छोट्यामोठ्या समस्या नगरसेवकांकडे मांडून नागरिक विषय मार्गी लावून घेत होते. मतदार नाराज होऊ नयेत, यासाठी नगरसेवकही प्रशासनाकडून अनेक कामे करून घेत होते. पण अडीच वर्षांपासून नगरसेवकांअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या माजी नगरसेवकांकडे नागरिकांच्या तक्रारी घेऊन गेल्यानंतर त्यांना प्रशासनाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, अशी स्थिती आहे. अधिकाऱ्यांना भेटून कामे मार्गी लागत नाहीत. नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तरी निरसन होत नाही. हा त्रास समाविष्ट ३४ गावांमध्ये जास्त असल्याने खासदार सुप्रिया सुळे दर महिन्याला महापालिकेत आढावा बैठक घेऊन समस्या सोडविण्यावर भर देत आहेत.

मोहोळ यांनीही शहरातील समस्यांवर बैठक घेतली. या वेळी भाजपच्या माजी नगरसेवकांनी त्यांच्या भागातील समस्यांचा पाढा वाचला. त्यावर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावर त्वरित कार्यवाही करत समस्या निवारण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

डॉ. कोल्हे यांचा जनता दरबार

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात हडपसर विधानसभेतील हडपसर आणि वानवडी रामटेकडी या दोन क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होतो. या भागातील पाणी, रस्‍ते, कचरा, ड्रेनेज यांसह अन्य नागरी विषयांवर त्यांनी जनता दरबार आयोजित केला होता. तेथे नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर डॉ. कोल्हे यांनी महापालिकेत आयुक्तांकडे बैठक घेतली. या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, विभाग प्रमुखांसोबत चर्चा केली.

नगरसेवक नसल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नाही. हडपसर आणि वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागरी समस्यांवर जनता दरबार घेतला होता. त्यावर आज महापालिकेत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्या सोडविण्यास सांगण्यात आले आहे.

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT