MPSC Exam postponed 
पुणे

हॉल परीक्षेचा नाही तर थेट लग्नाचा; ऐका MPSCच्या मुलींची व्यथा

सम्राट कदम

पुणे - शेती आणि मोलमजुरी करणाऱ्या घरच्यांनी काबाडकष्ट करत पदवीपर्यंत शिकविले. पदवीनंतरच खासगी कंपनीत नोकरी करता आली असती. परंतु मनामध्ये सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. कारण, भविष्यात कौटुबिंक कारणास्तव केंव्हाही खासगी नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल. पण सरकारी नोकरी म्हटल्यावर, कोण राजीनामा दे म्हणणार? त्यामुळे राज्यसेवेची ही परीक्षा आमच्यासाठी स्वातंत्र्याचा मार्ग आहे. आत्ता ही परीक्षा झाली नाही, तर घरी लग्नाची बेडी निश्चित आहे, अशी भावना पुण्यात आंदोलनात सहभागी परीक्षार्थी विद्यार्थिनींनी व्यक्त केली. 

जोगवडी (ता. बारामती) येथील रूपाली खोमणे आणि फलटण (जिल्हा सातारा) येथील धनश्री पवार या दोघी मैत्रिणींची ही प्रतिक्रिया. रूपालीच्या घरचे शेतमजुरी किंवा वाट्याने शेती करतात. तर धनश्रीचे वडीलांचे निधन झाले असून, आई आणि भाऊ तिच्या शिक्षणाचा खर्च करतात. दोघींनीही विचारपूर्वक स्पर्धापरिक्षेचा मार्ग स्वीकारत गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात राज्यसेवेची तयारी करत आहे. प्रत्येक महिन्याला त्यांना सरासरी दहा हजार रूपयांचा खर्च येतो. त्यात लॉकडाउनमुळे मागील दोन वर्षांपासून परिक्षाच झाली नाही. खर्च आणि वय दोन्हीही वाढत असल्यामुळे घरच्यांचा दबावही वाढत आहे. तब्बल पाच वेळा राज्यसेवीची ही परिक्षा पुढे ढकलल्याने मानसिक स्तरावरही मोठा त्रास झाल्याचे दोघी सांगतात. 

फलटणची असलेली धनश्री पवार ही पुण्यात राज्यसेवा परीक्षेची तयारी करते. ती म्हणाली की, सगळ्यांचा विरोध असताना आम्ही परिक्षेची तयारी करत आहोत. ही परिक्षा वेळेवर झाली नाही तर वडिलांनी पाहिलेले अधिकारी बनण्याचेच स्वप्न पाहणे बंद करावे लागेल. परीक्षेत नापास जरी झालो तरी चालेल, पण आता परीक्षा व्हायला हवी अशा भावना धनश्रीने व्यक्त केली.

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. यात यश लगेच मिळेल असं नाहीत त्यामुळे काही विद्यार्थी ठराविक वर्षेच अभ्यास करायचा असं ठरवून यासाठी प्रयत्न करत असतात. बारामतीच्या रुपाली खोमणे हिने म्हटलं की, घरच्यांनी राज्यसेवेच्या अभ्यासासाठी दोन-तीन वर्षे दिली होती. त्यातील लॉकडाउनमुळे दोन वर्षे तर परीक्षा झालीच नाही. आता ही परीक्षाही कारण नसताना पुढे ढकलली जात आहे. आम्ही एक स्वप्न घेऊन आलो आहे. आता घरी जायची वेळ आली तर लग्नाची गाठ निश्चित.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT