mpsc result 2024 hirdoshi yogesh dhamunase become psi education job Sakal
पुणे

MPSC Result 2024 : खडतर परिश्रमातून हिर्डोशीचा योगेश बनला पोलिस उपनिरीक्षक

घरात शिकलेले कोणही नसताना योगेशने जिद्द,चिकाटी व अपार मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

विलास मादगुडे

महुडे भोर : भोर तालुक्यातील दुर्गम असलेल्या हिर्डोशी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील योगेश अनिल धामुनसे या तरुणाने कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या हिमतीवर खडतर परिश्रमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदी विराजमान झाला आहे.

नीरा देवघर धरणग्रस्त असलेले व सध्या शेती करून उदरनिर्वाह करत असलेले योगेशचे वडील अनिल तान्हू धामुनसे यांचे शिक्षण अवघे सातवीपर्यंत तर गृहिणी असलेली आई भिमाबाई अशिक्षीत आहेत. अशा ही परिस्थितीतील शेतीत काबाडकष्ट करुन आई वडीलांनी योगेशच्या शिक्षणासाठी योगदान दिले.

घरात शिकलेले कोणही नसताना योगेशने जिद्द,चिकाटी व अपार मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे. मुलाने मिळवलेल्या यशाची बातमी कळल्यावर आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पहायला मिळाले. तर गावचा मुलगा अधिकारी झाल्याने गावकर्यांनी आनंद व्यक्त केला.

लहानपणापासून पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न उरी बाळगलेल्या योगेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिर्डोशी येथे झाले. पाचवी पासून दहावीपर्यंतचे शिक्षण हिर्डोशी येथील समर्थ रामदास स्वामी विद्यालयात तर अकरावी बारावी भोर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे झाले.

अनंतराव थोपटे महाविद्यालयात कॉम्पुटर सायन्स मध्ये पदवीचे शिक्षण घेतले. पुढे त्याने पुण्यात राहून कायद्या विषयीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये शिक्षण दिले. यामध्ये मिळणार्या पैशातून पुण्यातील खर्च भागवू लागला.

त्यातच त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून ३३६ मार्क मिळवत ६४ रॅंकने उत्तीर्ण झाला. योगेशला आई वडीलांबरोबरच चुलते ज्ञानोबा धामुनसे, सुरेश धामुनसे,

भागुजी धामुनसे तसेच कुटुंब, गावकरी व मित्र परिवाराचे नेहमी सहकार्य लाभले. योगेशची बहिण विवाहित असून लहान भाऊ तुषार ही उच्चशिक्षित आहे. पुण्यात योगेचा मित्रमंडळींकडून सत्कार करण्यात आला तर हिर्डोशी पंचक्रोशीत योगेशचे अभिनंदन होत असून हिर्डोशी ग्रामस्थ व हिरडस मावळाच्या वतीने रविवारी (ता.४) गावातून मिरवणूक काढून स्वागत करण्यात येणार आहे.

"स्वप्नातही वाटले नव्हते मुलगा एवढा मोठा पोलिस अधिकारी होईल. योगेशने पुण्यात राहून मन लावून केलेल्या अभ्यासाचे फळ त्याला मिळाले आहे. त्याच्या या यशाने आमचे कुटुंब व गाव आनंदाने भारावून गेले आहे."

अनिल धामुनसे (योगेशचे वडील)

"अभ्यासात एकाग्रता, सातत्य व जिद्द असली की यश‌ हमखास मिळते. ग्रामीण भागातील मुलांनीही शिक्षणाचा पुरेपूर फायदा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करुन आपल्या कुटुंबासह गावचा नावलौकिक वाढवला पाहिजे."

योगेश धामुनसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT