mpsc student darshana pawar murder case timeline autopsy report Pune Crime news  
पुणे

Darshana Pawar : MPSC परीक्षेतील यशानंतर सत्कारासाठी दर्शना पुण्यात आली अन्…; अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितला घटनाक्रम

रोहित कणसे

दोन दिवसांपूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या घटनेने राज्यात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाली. आता दर्शना पवार हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे.

दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या आहेत. यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी या हत्येच्या तपासासाठी पाच पथकं देखील तयार केली आहेत.

एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावलेली दर्शना दत्ता पवार ही तरूणी संजीवनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कॉलनी, सहजानंदनगर, ता. कोपरगाव, जि.अहमदनगर येथील राहाणारी आहे. तिची एमपीएससीच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर निवड झाली होती. कित्येकांचं स्वप्न असलेलं यश मिळवणाऱ्या दर्शनाच्या हत्येने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

दर्शना हत्या प्रकरणात नेमकं काय घडलं याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षकां मितेश घट्टे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, १८ जून रोजी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून सिंहगड पोलिस स्टेशन येथे १२ जून रोजी दाखल हरवल्याच्या तक्रारीतील व्यक्तीचे वर्णन जुळत असल्याने मृतदेहाची ओळख पटवता आली.

त्यानुसार आढळलेला मृतदेह कोपरगाव येथील दर्शना पवार ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलीचा असल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत, ८ जून रोजी ती पुण्यात तिच्या सत्कारानिमीत्त आली होती हे देखील समोर आले, असे घट्टे यांनी सांगितलं.

सत्कार स्वीकारण्यााठी आली होती पुण्यात

दर्शनाने परीक्षेत मिळवलेल्या यशानंतर १० जून रोजी ती शिक्षण घेत असलेल्या संस्थेत तिचा सत्कार ठेवण्यात आला होता. मात्र मध्येच दर्शना आणि तिच्या वडीलांचा संपर्क तुटला. दर्शनाचे १० जून रोजी तिच्या पालकांसोबत शेवटचं बोलणं झाले होते. यानंतर संपर्क होत नसल्याने दर्शनाच्या वडिलांनी सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि ती हरवल्याची तक्रार दाखल केली.

पुढे दिनांक १८ जून रोजी एका मुलीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला असे पोलिस अधिक्षक म्हणाले. दरम्यान हा मृत्यू कसा झाला असावा याचा आता पोलिसांचा शोध सुरू असून पोस्टमार्टमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निष्कर्षांनुसार हा घातपात असावा असा अंदाज आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT