स्वारगेट : कोरोना (Corona) व मराठा आरक्षणामुळे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा, तसेच सरळसेवेची भरती प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक वर्ष वाढून देण्याची मागणी केली होती याचा सकाळने वेळोवेळी पाठपुरावा केला होता . त्याची दखल घेत आज राज्य शासनाने , ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत, शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब" म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे असा अध्यादेश काढला आहे .यामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात जाहिराती प्रसिध्द झाल्या नसल्याने, या कालावधीत काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने, त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मा.मंत्रिमंडळाच्या दि. १० नोव्हेंबर, २०२१ च्या बैठकीत चर्चा झाली होती .त्यानुसार अशी संधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मात्र तो निर्णय आज घेण्यात आला अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली .
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक, या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल, अशा प्रकरणी देखील दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत आहे त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे, मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी देखील विद्यार्थ्यांना संधी देणार आहोत असे अध्यादेशात नमूद केले आहे .
भरणे यांनी शब्द पाळला ........
सकाळ ,साम आयोजित एमपीएससी विद्यार्थी परिषदेमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही . शासनाशी भांडून मी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एक वर्ष वाढीव देणार असे आश्वासन दिले होते.त्यामुळे भरणे यांनी शब्द पाळला अशी चर्चा विद्यार्थी वर्गात आहे.
हा निर्णय घेताना अनेक अडचणी आल्या पण मी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढीव देण्यावर ठाम होतो.आमचं सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करणार आहे हे या अध्यादेश यातून स्पष्ट होत. त्याचबरोबर नियुक्तीच्या संदर्भातील चारशे सोळा विद्यार्थ्यांचा प्रश्न मी दहा दिवसांत सोडवणार आहे .
दत्तात्रय भरणे( राज्यमंत्री सामान्य प्रशासन विभाग)
या निर्णयाने अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे . मात्र पुढील वर्षी राज्यशासन किती परीक्षेच्या जाहिराती काढणार यावर विद्यार्थ्यांना किती लाभ झाला हे ठरणार आहे .
सनी चव्हाण ( स्पर्धा परीक्षा विद्यार्थी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.