Mukta-Tilak sakal
पुणे

स्थायी समिती आणि प्रशासनावर आमदार मुक्ता टिळक यांनी साधला निशाणा

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्याच्या दुरवस्थेवर नागरिकांकडून टीका केली जात असताना, आता भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही स्थायी समिती आणि प्रशासनावर निशाणा साधला.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्याच्या दुरवस्थेवर नागरिकांकडून टीका केली जात असताना, आता भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही स्थायी समिती आणि प्रशासनावर निशाणा साधला.

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्याच्या दुरवस्थेवर नागरिकांकडून टीका (Comment) केली जात असताना, आता भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनीही स्थायी समिती (Standing Committee) आणि प्रशासनावर (Administrative) निशाणा साधला आहे. नागरिकांची गैरसोय होत असताना त्यावर स्थायी समिती आणि प्रशासन गंभीर नाही, त्यांनी त्यांच्यातील हेवेदावे त्वरित मिटवावे आणि शिवाजी रस्ता चांगला करून द्यावा, असा सल्ला पत्रकातून दिला आहे.

पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी याचे काम करण्यासाठी गेल्या १० महिन्यापासून शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता यासह इतर भागात काम सुरू आहे. हे काम करत असताना योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आता हे रस्ते १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान दुरुस्त केले जातील असा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनीही ही माहिती दिली होती.

आमदार मुक्ता टिळक यांनी अंदाजपत्रकात बाजीराव रस्त्यावर उड्डाणपूल प्रस्तावित करून त्यासाठी ‘स’ यादीतून २कोटी रुपये तरतूद केली. पण हा प्रकल्प करणे शक्य नसल्याने या दोन कोटी पैकी एक कोटी रुपये शिवाजी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव टिळक यांनी दिला होता. यामध्ये प्रशासनाने माझी दिशाभूल करून या निधीची गरज नसल्याचे सांगितले. पण नंतर निधीची गरज असल्याचे सांगून निधीची मागणी केली. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष रासने यांच्याशीही चर्चा करूनही व निधीची गरज असतानाही वर्गीकरण करण्याचा निर्णय करण्यास दोन महिने लावले.

यासर्व प्रकारावरून स्थायी समिती व प्रशासन नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल गंभीर नाही. त्यांनी परस्परांमधील हेवेदावे संपवावे. मला यामध्ये कोणतीही श्रेयवादाची लढाई लढवायची नाही. शिवाजी रस्ता खूप रहदारीचा असल्याने नागरिकांची सोय होणे महत्त्वाचे आहे, असे मुक्ता टिळक यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी, अदानी समूहाचे शेअर्स कोसळले

Karad Accident : मलकापुरात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच अपघात

Bike Accident : भरधाव टेम्पोच्या धडकेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जागीच ठार; डोक्याला गंभीर मार लागला अन्..

SCROLL FOR NEXT