मी पत्नीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र दुर्दैवाने तिला बाहेर पडताच आले नाही, असे सांगत आगीत पत्नी गमावलेल्या बबन मरगळे यांनी टाहो फोडला.
पुणे - आग लागल्यानंतर मी पत्नीचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र, स्फोट झाल्याने आगीचा भडका झाला. त्यामुळे त्वरित तेथून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतरही मी पत्नीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र दुर्दैवाने तिला बाहेर पडताच आले नाही, असे सांगत आगीत पत्नी गमावलेल्या बबन मरगळे यांनी टाहो फोडला. कंपनी व त्यात असलेली पत्नी बेचिराख झाल्याची मन पिळवटून टाकणारी घटना त्यांच्यासमोर घडली.
बबन आणि मंगल मरगळे हे दांपत्य कंपनीत पॅकेजिंग विभागात कामाला होते. कंपनीत आग लागल्यानंतर बबन त्वरित तेथून बाहेर पडले. मात्र, मंगल यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. दुर्दैव म्हणजे एका महिन्याच्या सुटीनंतर मंगल यांचा आज कामाचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे कामाचा पहिलाच दिवस त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला.
महिनाभराच्या सुटीनंतर मंगल ही पुन्हा कामावर परतली होती. मी मात्र नियमित कामाला जात होतो. चारच्या सुमारास आग लागल्यानंतर आम्ही त्वरित बाहेर पडलो. त्यावेळी सुमारे ४० कर्मचारी कंपनीत होते. मी बाहेर पडलो. पण मंगलला बाहेर येताच आले नाही, असे बबन यांनी सांगितले.
बबन आणि मंगल मरगळे हे मूळचे पिरंगुटजवळ असलेल्या खरवडे या गावचे. पती-पत्नी आणि ११ वर्षीय मुलगा तेजस व ९ वर्षीय मुलगा दर्शन असं मरगळे यांचे कुटुंब. सुटीनंतर कामाचा पहिलाच दिवस असल्याने मोठ्या उत्साहात मंगल या कामाच्या ठिकाणी रुजू झाल्या होत्या. कुटुंबासाठी काहीतरी करायचे, या जिज्ञासेपोटी मंगल नोकरी करीत होती. बऱ्याच प्रयत्नानंतर तिला ही नोकरी मिळाली होती. गरीब कुटुंबातील मंगल ही महत्त्वाकांक्षी होती, अशी माहिती त्यांचे नातेवाईक भाऊ आखाडे यांनी दिली.
आई कधी परतणार?
महिना भराच्या सुटीनंतर आर्इ पहिल्यांदाच कामावर जात असल्याने ती कधी परत येणार, अशी आस लावून मुलं घरी बसली होती. मात्र आई परत येण्याऐवजी तिच्या निधनाची बातमी घरी आली. त्यामुळे तिच्या मुलांना आता काय सांगायचं असा प्रश्न आम्हाला पडला आहे, अशी भावना आखाडे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.