murder sakal
पुणे

Pune Crime : पूर्व वैमनस्यातून गुंडाचा खून; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्व वैमनस्यातून लष्कर भागात गुंडाचा खून करण्यात आल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पूर्व वैमनस्यातून लष्कर भागात गुंडाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. खून करून पसार झालेल्या टोळक्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरबाज बबन शेख (वय ३५, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे.

लष्कर भागातील ताबूत स्ट्रीट परिसरात खाऊ गल्ली आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास तेथे मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेखवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. तसेच त्याच्या डोक्यात दगड मारण्यात आला होता. शेखला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक प्रियांका शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.

शेखवर २५ गुन्हे दाखल -

शेखवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग अशा प्रकारचे २५ गुन्हे दाखल आहेत. त्याची लष्कर भागात परिसरात दहशत होती. पोलिस आयुक्तांनी शेख याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. वर्षभरासाठी त्याला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून त्याची नुकतीच सुटका झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 22th नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT