Crime news  esakal
पुणे

सलून व्यवसायिकावर कुऱ्हाड व लोखंडी सत्तूरने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

शेळगाव (ता. इंदापूर) येथे सलून व्यवसायिकावर कुऱ्हाड व लोखंडी सतूर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघांजणावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

शेळगाव (ता. इंदापूर) येथे सलून व्यवसायिकावर कुऱ्हाड व लोखंडी सतूर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघांजणावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

वालचंदनगर - शेळगाव (ता. इंदापूर) येथे सलून व्यवसायिकावर (Salon Professional) कुऱ्हाड व लोखंडी सतूर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी (Police) तिघांजणावर गुन्हा (Crime) दाखल करुन अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी शरद रामा माने (वय ३५), दादा बाबुस माने (वय २८) व मल्हारी रोहिदास खोमणे (वय ३५, रा. सर्वजण शेळगाव) यांना अटक केली आहे. याप्रकरणी बापुराव शंकर राऊत (वय ४१) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सोमवार (ता. २८) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बापुराव राऊत सलूनच्या दुकानामध्ये काम करीत असताना वरील तिघांनी अचानक कुऱ्हाड व लोखंडी सुऱ्याने राऊत यांच्या डोक्यात, कपाळावर, छातीवर, नाकावर व पायाच्या गुडघ्यावर वार जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच, यापुढे दुकान चालविण्यासाठी महिन्याला एक हजार रुपये खंडणी मागून राऊत यांच्या खिशातील ५०० रुपये व दुकानातील गल्यातील ३०० रुपये असे ८०० रुपये घेवून पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना तातडीने अट केली. तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पाेलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT