Murlidhar Mohol Oath Ceremony Sakal
पुणे

Murlidhar Mohol Portfolio: मुळशीचा पैलवान शहांच्या मंत्रालयाचा उपकर्णधार! मुरलीधर मोहोळांच्या खात्याचा पुण्याला फायदा काय? जाणून घ्या

केंद्राचा काल शपथविधी सोहळा पार पडला, यानंतर आज खातेवाटप जाहीर झालं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पुण्याचे पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं आणि आता खातंही जाहीर झालं आहे. केंद्रात महत्वाच्या मंत्रीपदावर असलेल्या अमित शहा यांच्या मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद मोहोळ यांना देण्यात आलं आहे. पण या खात्याचा पुणे शहराला काय फायदा होणार जाणून घेऊयात. (Murlidhar Mohol portfolio announced got ministry of state co pperative civil aviation)

मुरलीधर मोहोळ यांनी काल राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण आज त्यांना सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालय जाहीर झालं आहे. म्हणजेच केंद्रीय सहकार मंत्रालय हे अमित शहा यांच्याकडं आहे त्याचं राज्यमंत्रीपद हे मुरलीधर मोहोळ यांच्याकडं असणार आहे. महाराष्ट्र हे सहकाराची गंगोत्री आहे, इथूनच सहकाराचा पाया देशभरात रोवला गेला. त्यामुळं महाराष्ट्रासाठी सहकार राज्यमंत्रीपद महत्वाची भूमिका बाजवू शकतं.

मोहोळ यांच्या खात्याचा पुण्याला काय फायदा?

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचं मुख्यालय हे पुण्यात आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागात साखर संकुल नावानं हे मुख्यालय ओळखलं जातं. त्यामुळं पुण्याच्या खासदाराकडंच या खात्याची जबाबदारी देण्यात आल्यानं पुणे जिल्ह्यातील सहकारासोबतच राज्याच्या सहकार क्षेत्रात अमुलाग्र काम करण्याची संधी मोहोळ यांना मिळाली आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयामुळं पुण्याला काय फायदा?

नागरी उड्डाण मंत्रालयाचं राज्यमंत्रीपदही मोहोळ यांना मिळाल्यानं त्याचाही फायदा पुणे शहराला आणि पर्यायानं पुणेकरांना होऊ शकतो. पुण्याचं सध्याचं लोहगाव येथील विमानतळ तसंच पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाची कामं आणि मंजुऱ्या या कामातही वेग येईल अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT