Murlidhar Mohol:
लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील २० जागांवर भाजपने उमेदवार दिले. यामध्ये सर्वात जास्त लक्ष पुणे लोकसभेवर होते. भाजपकडून पुण्यात जगदीश मुळीक, सुनिल देवधर आणि मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपने पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव जाहीर केलं.
आता पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा समाना कोण करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, रविंद्र धंगेकर, आबा बागुल तर आता नुकताच मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरे, प्रविण गायकवाड, या नावांची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आता कुणाला तिकीट देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
जगदीश मुळीक हेही लोकसभेच्या स्पर्धेत होते. भाजपचे विद्यमान आमदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांनी ही जागा लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र त्यांनी फेसबूक पोस्ट करत आपले म्हणणे मांडले आहे. जनतेच्या सेवेत कायमच असेन.
कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद, अशी पोस्ट जगदीश मुळीक यांनी यांनी केली आहे.
2014 आणि 2019 मध्ये भाजपने पुणे लोकसभेची जागा मोठ्या फरकाने जिंकली होती. मात्र मार्च २०२३ मध्ये विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली. निवडणूक आयोगाने काही राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि 2024 मधील पुढील सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीत व्यस्त असल्याने पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला होता. (Latest Marathi News)
मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळाले असले तरी त्यांच्यासाढी लढाई सोपी नाही. त्यांना महाविकास आघाडी तगड आव्हान देण्याच्या तयारीत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होता. रविंद्र धंगेकर यांनी ही निवडणूक जिंकली होती. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद देखील वाढली आहे.
असा आहे मोहोळ यांचा राजकीय प्रवास-
सभासद, पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ, पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक म्हणून निवडूण आले होते. २००९ मध्ये खडकवासला विधानसभा निवडणूक लढवली. २०१७-१८ मध्ये महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते. २०१७-१८ मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक, पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सभासद होते. २०१९ ते २०२२ पुणे महापालिकेचे महापौर म्हणून त्यांनी काम पाहीले. २०२३ मध्ये प्रदेश सरचिटणीसपदावर नियुक्ती करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.