Nagar Road BRT Breaking sakal
पुणे

Pune BRT : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या 'बीआरटी'ला स्वतः नष्ट केल्याबद्दल पुणे महापालिकेचे अभिनंदन!

आता वाहतूक कोंडी होणार नाही, याची हमी महापालिका देणार का? संतप्त पुणेकरांची, स्वयंसेवी संस्थांची महापालिका प्रशासनावर जळजळीत टीका.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जागतिक पातळीवर शाश्‍वत वाहतूक पुरस्कार मिळविणारी, पर्यावरण संवर्धनाचा पुरस्कार करणारी महापालिका अशी पुणे महापालिकेची खास ओळख. याच महापालिकेने केंद्र सरकारच्या पैशातून "बीआरटी' उभारली, या बीआरटीवरच्या नावावर अनेक पुरस्कार मिळविले, त्यासाठीचे सत्कार, हारतुरे स्वीकारले.

आता मात्र त्याच बीआरटीला स्वतःच्या हाताने नष्ट करणारी महापालिका म्हणून यापुढे पुणे महापालिका ओळखली जाईल, या नवीन बिरूदाबद्दल महापालिका प्रशासनाचे अभिनंदन ! आता जागतिक शाश्‍वत वाहतूक पुरस्कार, राहण्यायोग्य उत्तम शहर, असे मिळालेले पुरस्कार, त्याच आवेशात परत कराल का ? अशा खोचक शब्दात महापालिका प्रशासनाकडून बीआरटी मार्गिका काढण्याच्या गैरकारभारावर पुणेकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता.६) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक नगर रस्त्यावरील दीड किलोमीटरपेक्षा जास्त बीआरटी मार्गिका काढून टाकला. महापालिका अधिकाऱ्यांच्या या गैरकारभाराबद्दल पुणेकरांनी संताप व्यक्त करण्यास सुरवात केली.

वास्तुविशारद व वाहतूक नियोजक प्रांजली देशपांडे, पादचारी प्रथमचे प्रशांत इनामदार, परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ, पर्यावरण शिक्षण केंद्राच्या संस्कृती मेनन यांनी नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्याच्या महापालिकेच्या कृतीवर खरमरीत पत्र लिहून त्यांचा निषेध नोंदविला आहे.

बीआरटीने सार्वजनिक वाहतुकीला उत्तेजन दिले. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बीआरटीतून प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांपेक्षा, खासगी वाहनचालकांना होणारा त्रास अधिक जाणवला. अखेर महापालिकेचे हुशार प्रशासक खासगी वाहनचालकांच्या आवाजाला बळी पडल्याचा खेद वाटतो. हेच वाहनचालक बीआरटी फेल झाल्याची ओरड करत होते. बीआरटीत त्रुटी होत्या, पण त्या कधी दूर केल्याच नाहीत.

त्याऐवजी बीआरटी संपविण्याचा आत्मघातकी मार्ग आपण निवडला, हे पुणेकरांचे दुर्दैव, असे पत्रात नमूद केले आहे. 'सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट'चे संचालक हर्षद अभ्यंकर म्हणाले, 'विद्यार्थी नापास होतो, परिक्षा नाही. बीआरटीच्या परिक्षेत इतर शहरे पास झाली, पण आपल्याकडे त्याची अंमलबजावणी केली नाही. प्रशासकांमुळे पुणे बीआरटी नापास झाली.'

वाहतुकीचा अभ्यास नसलेल्यांनी केला अहवाल, कंत्राट देण्यासाठी घाईगडबड

महापालिकेने वाहतूक धोरण, विकास आराखडा बाजूला सारून वाहतुकीचा अभ्यास नसलेल्या संस्थेकडून नगर रस्ता बीआरटी मार्गिकेबाबतचा अहवाल मागविला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर बीआरटी मार्गिका काढण्याचे कंत्राट देण्याच्या आनंदात महापालिका प्रशासनालाही अहवाल दाखविण्याचे कष्ट महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतले नाहीत.

जे प्रवासी खासगी वाहनांऐवजी बसने प्रवास करून वाहतूक कोंडी कमी करतात, त्यांचाच आपण विश्‍वासघात केलात, तुमच्या या खेळात पुण्याला मात्र कित्येक वर्ष मागे नेऊन ठेवल्याची तिखट टीका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी केली आहे.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनाही पाठविले पत्र!

पंतप्रधान कार्यालय, स्मार्ट सिटीज मिशन कार्यालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेच्या कृतीबाबत पत्र पाठविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT