narayangaon gramonnati mandal college sign agreement with bangkok university Sakal
पुणे

Pune News : नारायणगाव महाविद्यालयाचा बँकॉक येथील विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्यशाळा, परिषदा आणि सेमिनार्स एकमेकांच्या सहकार्याने घेता येतील

रवींद्र पाटे

नारायणगाव: बँकॉक, थायलंड येथील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या विद्यापीठा बरोबर शैक्षणिक सामंजस्य करार करणारे नारायणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे भारतातील एकमेव कॉलेज ठरले आहे.

अशी माहिती प्राचार्य डॉ. ए. बी. कुलकर्णी यांनी दिली. सदर शैक्षणिक सामंजस्य करार हा पुढील पाच वर्षासाठी असेल. सदर सामंजस्य करारांतर्गत दोन्ही संस्थांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तज्ञ शिक्षकांची देवाण- घेवाण होणार आहे.

शैक्षणिक कार्यकमांबरोबरच सांस्कृतिक कार्यकमांसाठी पदवी आणि पदव्युत्तर तसेच पीएच. डी. रिसर्च स्कॉलर विद्यार्थी लाभ घेऊ शकतील. इंटर्नशिपसाठी दोन्ही संस्थांचे विद्यार्थी लाभ घेऊ शकतील.

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्यशाळा, परिषदा आणि सेमिनार्स एकमेकांच्या सहकार्याने घेता येतील. संशोधन मार्गदर्शक शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी एकत्रित संशोधन प्रकल्प पूर्ण करू शकतील.

त्यासाठी त्यांची देवाण-घेवाण करणे शक्य होईल.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कुलकर्णी, वाणिज्य संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. जे. पी. भोसले, प्रा. डॉ. एस. डी. टाकळकर, डॉ. अनुराधा घुमटकर,

डॉ. विनोद पाटे, डॉ. आबा जगदाळे यांनी सामंजस्य करार प्रकियेत विशेष योगदान दिले.या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करारासाठी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रविंद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह अरविंद मेहेर यांनी प्रोत्साहन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; 'या' नव्या चेहऱ्यांना संधी

Vikhe-Thorat Controversy: विखे-थोरात वाद टोकाला! "नीच लोकांना...."; सत्यजीत तांबे आक्रमक!

Ambabai Temple : अंबाबाई चरणी तब्बल एक कोटी 14 लाखांचं दान; मंदिर आवारातील 12 देणगीपेट्यांतील मोजणी पूर्ण

Navi Mumbai: नवी मुंबईत भीषण अपघात; डम्परला कार धडकली, दोघांचा मृत्यू!

Sakal Podcast: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती ते तालिबानमध्ये टीव्हीवर दिसणार नाहीत जिवंत प्राणी

SCROLL FOR NEXT