Shankar Bhor and Ganesh Bhor sakal
पुणे

Narayangav Robbery : सशस्त्र दरोड्यात तीन जण गंभीर जखमी; सहा लाख रुपयांच्या मुद्देमालाची लूट

हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील सातपुडा मळा शिवारात आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा टाकला.

रवींद्र पाटे

नारायणगाव - हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील सातपुडा मळा शिवारात आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा टाकून रोख रक्कम व सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

चोरट्यांनी दगड,कोयता व काठीने केलेल्या हल्ल्यात गणेश मुरलीधर भोर( वय ३९),त्यांची पत्नी प्रमिला गणेश भोर( वय ३५),आई रंजना मुरलीधर भोर( वय ६०) ,चुलते शंकर रभाजी भोर(वय ७५) हे गंभीर जखमी झाले आहेत.हल्ल्यात त्यांच्या डोके, हात व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.

शंकर भोर यांचा हात मोडला असून रंजना भोर यांचे ओठ व दात आदी अवयवांना तर  गणेश भोर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अशी माहिती डॉ.प्रवीण शिंदे यांनी दिली.या घटनेमुळे हिवरे तर्फे नारायणगाव परिसरात शेतावर वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेश भोर यांचा सातपुडा मळा शिवारात शेतात बंगला आहे. घरात यांच्यासह आठ  सदस्य राहत आहेत.आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतुन घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सदस्यांना वीट, दगड, काठी व कोयत्याने हल्ला चढविला.

त्यानंतर कुऱ्हाड मानेवर ठेवून जीवे मारण्याची धमकी देऊन महिलांच्या अंगावरील दागिने काढून घेतले.कपाट फोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.या बाबतची माहिती मिळाल्यानंतर नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ताटे,फौजदार विनोद दुर्वे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळी श्वान पथक आले होते.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी भेट देऊन पाहणी केली.आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कार्यरत करण्यात आले आहे.

नारायणगाव पोलिस ठाणे परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.१४ मे २०२३ रोजी येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या नारायणगाव ग्रामपंचायतिचे माजी उपसरपंच आशिष माळवदकर व जुन्नर पंचायत समितीच्या माजी सदस्या अर्चना आशिष माळवदकर यांच्या श्री गजानन अपार्टमेंट मधील बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील तीन लाख रुपयांची रोख रक्कम,सोन्याचे व चांदीचे साडे एकोणचाळीस तोळे  दागिने असा तेवीस लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

परिसरातील बंद फ्लॅट मध्ये सुद्धा चोऱ्या झाल्या आहेत. चौदा नंबर येथील दरोड्याचा व चोऱ्यांचा अद्याप तपास लागला नसतानाच आज पहाटे सातपुडा मळा शिवारात दरोड्याचा घटना घडली. नारायणगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या वीस गावा पैकी चौदा गावे बागायती क्षेत्रात येतात. या भागातील शेतकरी शेतावर वस्ती करून रहात आहेत.शेतकरी बिबट्यांची दहशतीखाली असतानाच दरोड्याची घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT