Dr. Narendra Dabholkar sakal
पुणे

Narendra Dabholkar Case : सीबीआयने सादर केलेले पुरावे खोटे; आरोपींचा दावा

आरोपी वीरेंद्र तावडे याने सीबीआयचे विभागीय पोलिस अधिकारी चौहान यांना साक्ष देण्यासाठी न्यायालयात बोलावण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आमच्या विरोधात जे पुरावे सादर केले आहेत ते खोटे आहेत, असे उत्तर या गुन्ह्यातील आरोपींनी न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नावर दिले. खटल्यातील आरोपी शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर यांनी याबाबत त्याचे लेखी म्हणणे देखील सादर केले आहे.

आरोपी वीरेंद्र तावडे याने सीबीआयचे विभागीय पोलिस अधिकारी चौहान यांना साक्ष देण्यासाठी न्यायालयात बोलावण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. यातील ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे दोघेही जामिनावर बाहेर आहेत. खटल्याची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे.

सीबीआयच्या साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण -

या गुन्ह्यात आत्तापर्यंत सीबीआयकडून २० साक्षीदार तपासण्यात आले आहेत. त्यांची उलटतपासणीही घेण्यात आली. यामध्ये किरण केशव कांबळे आणि विनय केळकर या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ससूनच्या शवविच्छेदन विभागाचे डॉ. अजय तावरे, फिर्यादी नवनाथ रानगट, संजय सडविलकर, सोमनाथ धायडे आणि एस. आर. सिंग यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. सीबीआयने निश्चित केलेल्या सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे.

बहुतांश प्रश्नांची उत्तरे आरोपींना माहिती नाहीत -

विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात डॉ. दाभोलकर खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. यावेळी न्यायालयाने आरोपींना सुमारे ३०० प्रश्न विचारले. त्यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे आरोपींनी ‘नाही’, ‘माहिती नाहीत’ अशी दिली. तसेच सीबीआयने जे पुरावे सादर केले आहेत, ते खोटे असल्याचे आरोपींनी न्यायालयास सांगितले. साक्षीदारांची यादी सादर करावे, असे आदेश न्यायालयाने बचाव पक्षाला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT