National Jal Academy playgrounds parks MP Supriya Sule Gajendra Singh Shekhawat sakal
पुणे

Pune News : राष्ट्रीय जल अकादमीची जागा क्रीडांगण, उद्यान उभारणीला द्यावी; सुप्रिया सुळेंची मागणी

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी खासदार सुप्रिया सुळेंची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : नांदेड परिसरातील राष्ट्रीय जल अकादमीची मोठी जागा आहे. ही जागा क्रीडांगण तथा उद्यानासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे केंद्र सरकारकडे केली.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अकादमी आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राष्ट्रीय जल अकादमी ही केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

या जागेवर परिसरातील नागरीकांनाठी क्रीडांगण तथा उद्यान उभारले गेल्यास त्याचा नागरीकांना फायदा होऊ शकेल, असे त्यांनी शेखावत यांना सांगितले. खडकवासला आणि आसपासच्या परिसरात मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान तसेच एखादे मोठे उद्यान नाही.

त्यामुळे जल अकादमीच्या मोठ्या जागेत हे प्रकल्प राबवता येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघात ' 'जल जीवन मिशन' अंतर्गत कामांसाठी जलसक्ती मंत्रालयाने केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी शेखावत यांचे आभारही मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT