हडपसर : कानपुर उत्तरप्रदेश येथे झालेल्या स्पेशल नॅशनल पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत येथील चितांमणी राऊत याने तीन सुवर्णपदके मिळवीत देशात अव्वल राहण्याचा मान मिळवला. स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
२०२७ मध्ये होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेची पहिली निवड चाचणी कानपुरच्या श्री शाहु महाराज विद्यापीठात घेण्यात आली. त्यामध्ये मागच्या स्पेशल ऑलिम्पिकच्या विजेत्या खेळाडूसह ९३ किलो वजनी गटातील सतरा खेळाडू सहभागी झाले होते. चिंतामणीने स्काॅट मध्ये १६० किलो, बेच मध्ये ८० किलो तर
डेडलिप्टमध्ये १६५ किलो वजन उचलून तीनही प्रकारात सुवर्णपदक मिळवले. स्पेशल ऑलिम्पिक भारतचे महाराष्ट्र सेक्रेटरी डाॅ. भगवान तलवार, तसेच जितेंद्र ढोले, आशोक नांगरे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक टी. बाकीराज, महाराष्ट्राचे प्रशिक्षक निकीता पराडकर व वडील बाळासाहेब राऊत हे चिंतामणीला मार्गदर्शन करीत आहेत.
चिंतामणीचे वडील बाळासाहेब राऊत म्हणाले, "चिंतामणीचे प्रशिक्षण व सरावसाठी कुटुंबातील आम्ही सर्व सदस्य प्रयत्न करीत आहोत. त्याला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षकही त्याच्याकडून अव्वल यशाची अपेक्षा ठेवून आहे. त्याची आतापर्यंतची कामगिरी पाहता, तीन वर्षाने होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत तो निश्चतपणे सुवर्ण पदक मिळवून देशाचा सन्मान वाढवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.