Fruit sakal
पुणे

Navratri Utsav : नवरात्रामुळे वाढली फळांना मागणी; भावामध्ये २० टक्‍क्‍यांनी वाढ

नवरात्रोत्सवामुळे बाजारात विविध प्रकारच्या फळांची मागणी वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड - नवरात्रोत्सवामुळे बाजारात विविध प्रकारच्या फळांची मागणी वाढली आहे. डाळिंब, पपई, पेरू, चिकू, सफरचंद, सीताफळ, संत्री आणि मोसंबी या फळांना जास्त मागणी आहे.

आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे बहुतांशी फळांच्या भावात १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. डाळिंबाचे भाव आधीपासूनच तेजीत आहेत. घाऊक बाजारात दर्जानुसार गणेश १० ते ३५ रुपये, आरक्त २० ते ८०, भगवे १२० ते ३०० रुपये असे एका किलोचे भाव आहेत. बाजारात ३० ते ३५ टन डाळिंबांची आवक झाली. नवरात्र सुरू झाल्यापासून भाव २० टक्क्यांनी वाढल्याची माहिती व्यापारी सिद्धार्थ खैरे यांनी दिली.

सफरचंदांची आवक हिमाचल प्रदेश आणि काश्‍मीर येथून होत आहे. हिमाचलचा हंगाम संपत आल्याने तेथून फारशी आवक नाही. २५ ते २७ किलोच्या पेटीला तीन ते साडेचार हजार रुपये असा भाव मिळत आहे. काश्मीरमधून दररोज सात ते आठ गाड्या आवक होत आहे. प्रकारानुसार सफरचंदांच्या १३ ते १९ डझनाच्या पेटीला १२०० ते २००० रुपये असा भाव मिळत आहे. सफरचंदांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी सलीम बागवान यांनी दिली.

चिकूची आवक जिल्ह्यासह सोलापूर आणि कर्नाटकमधून होत आहे. दररोज ८ ते १० टन आवक होत आहे. मागणी जास्त असल्याने भावात तेजी आहे. १० किलोला २०० ते ८०० रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी ज्ञानोबा बिराजदार यांनी सांगितले.

पेरूच्या भावातही २० टक्के वाढ झाली आहे. २० किलोला दर्जानुसार ४०० ते ८०० रुपये भाव मिळत आहे. सीताफळालाही मागणी वाढली आहे. दर्जानुसार किलोस २० ते १२० रुपये भाव मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे भाव १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली. पपईला किलोला २० ते ५० रुपये भाव मिळत असल्याचेही सांगण्यात आले.

मोसंबी आणि संत्रीलाही मागणी

मागणी वाढल्याने मोसंबी आणि संत्र्याच्या भावात २० टक्के वाढ झाली आहे. नगरहून ७० ते ८० टन मोसंबीची तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून २० ते २५ टन संत्र्यांची आवक झाली. मोसंबीचे तीन डझनचे १२० ते ३५०, चार डझनचे ४० ते १२० रुपये असे भाव आहेत. १० किलो संत्री दर्जानुसार १५० ते ८०० रुपये भावाने मिळत असल्याचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी सांगितले.

नवरात्राच्या काळात दरवर्षी पूजेसाठी फळांना मागणी वाढते. त्याप्रमाणे यंदाही मागणी वाढली आहे. बाजारात आवक वाढली आहे. परंतु त्या तुलनेने मागणी जास्त असल्याने सर्व प्रकारच्या फळांच्या भावात सुमारे २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

- अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT