पुणे

नौदल प्रमुखांनी पुण्यातील कॅडेट्सना दिलं पुश अप चॅलेंज; पाहा PHOTO

अक्षता पवार

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 140 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर हे उपस्थित होते. या प्रसंगी एनडीएचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री, उपप्रमुख व एनडीएचे मुख्य प्रशिक्षक रिअर ऍडमिरल संजय वात्सायन, एनडीएचे प्राचार्य डॉ ओ. पी मिश्रा आदी उपस्थित होते. यावेळी भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करंबीर सिंह यांनी युवा कॅडेटसा पुश अपस् मारण्याचे चॅलेंज दिले. त्यानंतर युवा कॅडेडसन पुश अपस् मारण्यास सुरवात केली. त्या प्रसंगाचे काही फोटो समोर आले आहेत. यावेळी 61 वर्षीय अधिकाऱ्याला हरविताना कॅडेडसना घाम फुटला अशी चर्चा सुरु होती.

एनडीएच्या 140 व्या तुकडीतून 215 कॅडेट्सने यशस्वीरीत्या पदवी पूर्ण केली आहे. यामध्ये मित्र देशातील 18 कॅडेट्सचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर बी टेक शाखेतून 44 नौदल कॅडेट आणि 52 हवाईदल कॅडेट्सला सुध्दा पदवी प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान हे कॅडेट्स पुढील प्रशिक्षणासाठी संबंधित सेवा अकॅडमीमध्ये दाखल होतील.

यावेळी शेकटकर यांनी लष्कराच्या सर्वात प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल कॅडेट्सचे अभिनंदन केले. त्याचबरोबर या देशसेवेसाठी लष्करात दाखल होण्यासाठी त्यांच्या पालकांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

"लष्करी अधिकाऱ्याने दृढनिश्चय, उत्साह, धैर्य आणि सभ्यता यासारखे गुण प्रदर्शित केले पाहिजेत. तसेच २१ व्या शतकात सैन्य अधिकारी म्हणून कोणत्याही कठीण परिस्थिती मध्ये जबाबदारीची भूमिका पार पाडत नेतृत्व करणे आवश्यक आहे."

- लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर

215 कॅडेट्सला पदवी प्रदान

पदवीची शाखा : कडेट्सची संख्या

विज्ञान : 48

संगणक विज्ञान : 93

कला : 74

यावेळी प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणर्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विज्ञान शाखेत कॅडेट आर सैनी याने प्रथम क्रमांक पटकावला. तर संगणक विज्ञान शाखेत कॅडेट जे ताम्रकर याने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. त्याचबरोबर सामाजिक विज्ञान शाखेत कॅडेट व्ही कुमार आणि बी टेक अभ्यासक्रमात कॅडेट व्ही उपाध्याय यांनी प्रथम स्थान पटकावले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून एनडीए मधील दीक्षांत संचलन सोहळा साध्या आणि मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पाडत आहे. यंदा ही हा सोहळा मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे एनडीएच्या वतीने सांगण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी (ता. 29) होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंझ! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

SCROLL FOR NEXT