Pune  Salak
पुणे

Pune : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादीचा झेंडा

तीन जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देवदत्त निकम, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदान झालेल्या तीन जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देवदत्त निकम, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर हे तिन्ही विद्यमान संचालक पुन्हा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले  असून अपक्ष तुकाराम बाबुराव गावडे यांचा दारूण पराभव झाला बिनविरोध निवड झालेले १८ व विजयी झालेले तीन असे एकूण सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील संस्थापक असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून श्री. वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे भीमाशंकर कारखाना प्रत्येक गाळप हंगामात परिसरातील इतर कारखान्याच्या तुलनेने ऊसाला उच्चांकी बाजारभाव देत आला आहे. त्यामुळे भीमाशंकर कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ, कर्मचारी व अधिकारी यांच्या योग्य नियोजनामुळे कारखान्यास आत्तापर्यंत देश  व राज्य पातळीवरील एकूण २४ पुरस्कार प्राप्त झाले आहे.सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण २१ जागांसाठी विद्यमान १९ संचालकांसह एकूण १०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

शिवसेनेने काही जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु अर्ज माघारीच्या दिवशी शिवसेनेच्या सर्व उमेदवारासह एकूण ८० उमेदवारांनी माघार घेतल्याने दिलीप वळसे पाटील यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

शिंगवे – रांजणी गटात तीन जागांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भीमाशंकर चे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर व अपक्ष तुकाराम बाबुराव गावडे या चार उमेदवारात लढत झाली. एकूण  11 हजार 711 मतदारांपैकी चार हजार 523 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आज सोमवारी मतमोजणी झाली यामध्ये देवदत्त निकम यांना चार हजार 174 मते पडली , बाबासाहेब खालकर यांना तीन हजार 909 मते व दादाभाऊ पोखरकर यांना तीन हजार 960 मते पडून विजयी झाले तर पराभूत तुकाराम गावडे यांना 796 मते पडली तर 88 मते बाद झाली

बिनविरोध निवड झालेले संचालक पुढील प्रमाणे उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था – दिलीप वळसे पाटील, मंचर / महाळुंगे गट- बाळासाहेब बेंडे, अंकित जाधव, अरुण चासकर, घोडेगाव / शिनोली गट- अक्षय काळे, सीताराम लोहोट, बाजीराव बारवे, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक / निरगुडसर गट- प्रदीप वळसे पाटील, रामचंद्र ढोबळे, अशोक घुले, अवसरी बुद्रुक/ पेठ गट- आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, शांताराम हिंगे, अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी – ज्ञानेश्वर आस्वारे, महिला राखीव प्रतिनिधी – पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – नितीन वाव्हळ, भटक्या विमुक्त जाती व जमाती किंवा विशेष मागासप्रवर्ग – रामहरी पोंदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT