Ajit Pawar Esakal
पुणे

Ajit Pawar: 'तात्या कधी येताय...वाट पाहतोय', नाराज वसंत मोरेंना अजित पवारांकडून ऑफर

मनसे सोडणार नसल्याचं देखील वसंत मोरे यांनी केलं स्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायरब्रँड नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा अनेक वेळा समोर येतात. तर काही दिवसांपूर्वी मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हाकालपट्टी करण्यात आली. त्यानंतरही मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर वसंत मोरे मनसे सोडणार की काय?, अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. अजितदादांच्या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांच्या भूवया उंचावल्याचे दिसुन आले आहेत.

एका विवाह सोहळ्यामध्ये वसंत मोरे आणि अजित पवार या दोघांनीही हजेरी लावली होती. त्याचवेळी अजित पवार- वसंत मोरे यांची भेट झाली आहे. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्यासाठीची ऑफर दिली आहे. अजित पवार तात्या कधी येता... वाट पाहतोय, असं म्हणाले आहेत. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्यामुळे मनसेमध्ये खळबळ वाढु शकते. वसंच मोरे पुण्यातील मनसेचा चेहरा आहेत. त्यामुळे वसंत मोरे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागुन असणार आहे.

तर यासंदर्भात बोलताना मनसे सोडणार नसल्याचे देखील वसंत मोरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी घेतलेली भुमिका वसंत मोरे यांना रुचली नाही. त्यानंतर मोरे यांनी ठाकरे यांची भेट घेतली आणि आपलं मत बोलून दाखवलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्त केलं होतं. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याची चर्चांना उधाण आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सोलापुरात भाजपच्या माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात पैसे वाटताना वकील सापडला; 80 हजार रुपयांची पाकिटे सापडली, पोलिसांत गुन्हा दाखल

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Woolen Clothes Skin Allergy: हिवाळ्यात स्वेटर घातल्यानंतर त्वचेला अ‍ॅलर्जी होते? हे टाळण्यासाठी करा सोपे घरगुती उपाय

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

SCROLL FOR NEXT