पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज बारामतीमध्ये आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी मणिपूर विषयावर भाष्य केलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न मणिपूरचा होता. ईशान्य भारतातील राज्य इतर देशांच्या सीमेला लागून आहेत. मणिपूरच्या सीमेला देखील दुसरा देश आहे. ज्या राज्यांच्या सीमा इतर देशांच्या सीमेला लागून आहेत, त्यांच्या यातना समजून घेणे आवश्यक आहे. अशा राज्यांकडे केंद्र सरकार लक्ष देत नसेल तर देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. (NCP leader sharad pawar on manipur violence )
आम्ही इंडिया आघाडीचे नेते हा मुद्दा उचलून धरत आहोत. तरी पंतप्रधान मोदी यांची चर्चा करण्याची तयारी नाही. त्यांनी दोन तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी भाषण केलं. पण, त्या भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी जी सक्तीची भूमिका घेणे आवश्यक होती ती घेतली गेलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणातून काहीही हातात पडलं नाही. तुमच्याकडे नऊ वर्षे झाली सत्ता हातात आहे. काँग्रेसकडे तीस वर्ष सत्ता होती. पण, नऊ वर्ष तुम्हाला सत्ता देऊन तुम्ही काय दिवे लावले,अशी टीका पवारांनी भाजपवर केली.
भाजपच्या घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करु नये, तसेच अजित पवार यांच्याशी झालेली भेट गुप्त नव्हती. कुटुंबातील वडीलधारा म्हणून मी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे विनाकारण संभ्रम निर्माण करु नका, असं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले आहेत.
जयंत पाटील यांच्या भाऊंना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय. काँग्रेसने चांगले काम केलं नाही, म्हणून जनतेने भाजपला संधी दिली. त्यामुळे काँग्रेसने तीस वर्षात काय केले असं विचारण्यापेक्षा तुमच्या नऊ वर्षाच्या काळात काय केलं, हे जनतेला सांगा, असं पवार म्हणाले. पवार यांनी आज नवाब मलिक यांना भेटणार असल्याचं सांगितलं. आज नवाब मलिक तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची आज भेट घेईन असं ते म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.